महापालिकेत पंचवीस वर्ष एकत्र सत्ता; पण आता देतायेत एकमेकांना दुषणे..

दोन दिवसांपुर्वी शहरात अतिवृष्टी झाली. शहरातील औषधी भवन इमारती खालून वाहणाऱ्या नाल्याचा प्रश्न जैसे थे आहे.
महापालिकेत पंचवीस वर्ष एकत्र सत्ता; पण आता देतायेत एकमेकांना दुषणे..
Shivesena-Bjp- Municipal Corporation News Aurangabad

औरंगाबाद ः महापालिका निवडणुका अद्याप जाहीर झालेला नसला तरी सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या परीने तयारी सुरू केली आहे. आतापर्यंत २५ वर्ष एकत्र सत्ता भोगलेले शिवसेना-भाजप हे दोघेही आता एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकून मैदानात उतरणार आहेत. (Twenty-five years of joint power in the corporation; But now they blame each other.) शिवसेनेकडून महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी, कार्यकर्ते मेळावे, विकास कामांच्या पुस्तिकांचे विमोचन आणि बरेच काही सुरू आहे.

नुकताच सुपर संभाजीनगर या विषयावरील पुस्तिकेचा विमोचन सोहळा शिवसेनेने घेतला. या सोहळ्याला १४ माजी महापौरांना बोलावण्यात आले होते. (Aurangabad Municipal Coporation) आतापर्यंत झालेला शहाराचा विकास हा शिवसेनेमुळेच झाला हे सांगण्याचा प्रयत्न यातून नेत्यांनी केला. पण त्यावर भाजपच्या गोटातून तिखट प्रतिक्रिया उमटल्या. शिवसेनेचे चौदा महापौर या शहराला अजूनही पाणी देऊ शकले नाहीत, हे त्यांचे पाप आहे, असा टोला भाजपने लगावला.

पण हा टोला लगावतांना आपणही या सत्तेत शिवसेनेच्या मांडीला मांडी लावून बसलो होतो, याचा सोयीस्कर विसर त्यांना पडला. (Shivsena Leader Chandrakant Khaire) भाजपने शहराला कितीही मंत्रीपद दिली तरी येणाऱ्या महापालिका निवडणुकीत महापौर शिवसेनेचाच असेल असा दावा करत भाजपला डिवचण्याची संधी सेनेच्या नेत्यांनीही सोडली नाही. त्यामुळे जेव्हा प्रत्यक्षात महापालिकेच्या निवडणुका जाहीर होतील, तेव्हा कधीकाळी एकमेकांच्या गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसेना-भाजपचे नेते आणि पदाधिकारी कुठल्या थराला जाऊन उणीदुणी काढतील हे पहावे लागेल.

भाजपने स्वबळावर महापालिका निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. राज्यातील नेत्यांचे दौरे शहरात वाढले आहेत. नव्यानेच मंत्री झालेले अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड देखील वारंवार बैठका घेऊन काय मागण्या आहेत, त्या सांगा निधी मी मिळवून देतो, असे सांगत आपल्यावर लक्ष केंद्रित करून घेण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपच्या हालचाली आणि त्यांच्याकडून शिवसेनेवर होणारी टीका पाहता, भाजप तयारीला लागली आहे हे स्पष्टपणे जाणवते.

मनसेशी त्यांची वाढत असलेली जवळीक, नेत्यांच्या भेटीगाठी पाहता महापालिका निवडणुकीत भाजप मनसेची साथ घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण शिवसेनेला आक्रमकपणे टक्कर देवून त्यांनीच या शहराची कशी वाट लावली हे सांगण्यासाठी भाजपमध्ये आता स्पर्धा लागली आहे. नेत्यांपासून ते माजी नगरसेवक, पदाधिकारी देखील यावर उघडपणे बोलू लागले आहेत. एवढेच नाही तर शिवसेनेला प्रत्येक ठिकाणी प्रखर विरोध करायचा ही रणनितीच आखण्यात आल्याचे चित्र आहे.

दोन दिवसांपुर्वी शहरात अतिवृष्टी झाली. शहरातील औषधी भवन इमारती खालून वाहणाऱ्या नाल्याचा प्रश्न जैसे थे आहे. दरवर्षी नालेसफाई व्यवस्थीत न झाल्याने नाला तुंबतो आणि आसपासच्या घरांमध्ये पाणी शिरते. कालच्या पावसात पुन्हा तेच घडले आणि नागरिकांच्या संतापाचा कडेलोट झाला. भाजपच्या माजी नगरसेविकेच्या दिराच्या माध्यमातून तो व्यक्तही झाला. पावसामुळे झालेले नुकसान आणि तुंबलेल्या नाल्याची पाहणी करण्यासाठी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, किशनचंद तनवाणी आले आणि भाजप पदाधिकाऱ्यांचा पाराच चढला.

नुसतीच पाहणी, परिणाम शून्य..

नुसती पाहणी करून काय करता, फोन केले तर फोन उचलत नाही, आता कशाला आले, असा संतपा आणि शिवीगाळ करत त्यांनी शिवसेनेच्या नेत्यांना जाब विचारला. यावेळी तिथे काहीवेळ तणावाचे वातावरण होते. या वादाला शिवसेना विरुद्ध भाजप असा रंग चढत असला तरी औषधी भवनच्या नाल्याचा प्रश्न मात्र राजकीय नाही, तो दरवर्षी उद्भवतो, लोकांचे व्यापाऱ्यांचे नुकसान होते, नेते येतात आणि पाहणी करून जातात, मात्र यावर कायमस्वरुपी तोडगा अद्याप कुणालाच काढता आलेला नाही.

विद्यमान एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी देखील या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली होती. मात्र काही तोडगा निघाला नाही आणि लोकांचा त्रास तसाच कायम आहे. यावरून राजकारण,आरोप-प्रत्यारोप न करता ठोस उपाय करून दरवर्षी होणाऱ्या त्रासातून या भागातील नागरिक, व्यापाऱ्यांची सुटका करावी, ही रास्त अपेक्षा बाळगतांना जर कुणाचा संयम सुटला असेल तर तो चुकीचा कसा म्हणणार. राजकारण होत राहणार, पण ते करतांना कुणाच्या जीवाशी आपण खेळ तर करत नाही ना? याचे भान देखील सत्ताधारी, विरोधकांनी बाळगायला हवे.

Edited By : Jagdish Pansare

Related Stories

No stories found.