भाजपला विश्वासात घ्या.., तरच सातारा जिल्हा बँकेत समीकरण जुळणार... 

भाजपची सहकारातीलही ताकद वाढली आहे. पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी तसेच जिल्ह्यातील भाजपच्या नेत्यांबरोबर चर्चा करुन आम्ही भूमिका जाहीर करणार आहोत.
भाजपला विश्वासात घ्या.., तरच सातारा जिल्हा बँकेत समीकरण जुळणार... 
Trust BJP .., only then the equation will match in the district bank says BJP leader Atul Bhosale

कऱ्हाड : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत भाजपला विश्वासात घेतल्याशिवाय कोणालाच त्यांचे समीकरण करता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका भाजपचे सरचिटणीस अतुल भोसले यांनी स्पष्ट केली. जिल्हा बँक जिल्ह्यातील शिखर संस्था आहे. त्याचे राजकारण करत असताना भाजपचा विचार घेतल्याशिवाय कोणालाही निर्णय घेता येणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. Trust BJP .., only then the equation will match in the district bank says BJP leader Atul Bhosale

राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी भाजपनेही तयारी सुरू आहे. भाजपा नेते भोसले यांनी आज त्यासंदर्भात पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, पक्षाची जिल्ह्यातील ताकद वाढली आहे. भाजप शिवाय जिल्हा मध्यवर्ती बँकेत कोणालाच आपले समीकरण करता येणार नाही असे येथे नमूद केले. 

भाजपची सहकारातीलही ताकद वाढली आहे. पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी तसेच जिल्ह्यातील भाजपच्या नेत्यांबरोबर चर्चा करुन आम्ही भूमिका जाहीर करणार आहोत. सहकार क्षेत्रात पक्षाची ताकद वाढली असल्याने त्याचेही चांगले परिणाम दिसत आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक शिखर संस्था आहे. त्या या संस्थेचे राजकारण करताना भाजपला विचारात घेतल्याशिवाय कोणालाच समीकरण करता येणार नाही. पक्षांच्या नेत्यांचा जो आदेश असेल त्याप्रमाणे आम्ही निर्णय घेवू. त्यानंतरच आम्ही आमची भूमिका जाहीर करू.


 

Related Stories

No stories found.