खंडाळा साखर कारखान्याचा बिगूल वाजला; मकरंद पाटलांच्या भूमिकेकडे लक्ष....

त्यानुसार सोमवार (ता. २०) व मंगळवारी (ता. २१) सकाळी ११ ते ३ या वेळेत खंडाळा तहसीलदार कार्यालयातील निवडणूक कार्यालयात नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची मुदत आहे.
The trumpet of Khandala sugar factory Election; Attention to the role of MLA Makrand Patil ....
The trumpet of Khandala sugar factory Election; Attention to the role of MLA Makrand Patil ....

लोणंद : खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा बिगूल वाजला असून, या कारखान्याच्या एकूण २१ जागांसाठी १७ ऑक्टोबर रोजी निवडणूक होत आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणे यांच्या वतीने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून, येत्या सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होत आहे. सध्या या कारखान्यावर माजी आमदार मदन भोसले यांच्या गटाची सत्ता आहे. सध्याच्या बदललेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आमदार मकरंद पाटील या निवडणुकीत लक्ष घालणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  The trumpet of Khandala sugar factory Election; Attention to the role of MLA Makrand Patil ....

खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. खंडाळा- म्हावशीच्या २०२०-२१ ते २०२५-२६ या कालावधीसाठी संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम यापूर्वी जाहीर झाला होता. १७ जानेवारी २०२० रोजी मतदार याद्या प्रसिद्ध होऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या २२ ते २६ फेब्रुवारी २०२१ या कालावधीपर्यंतचे अर्ज दाखल करण्याचे तीन दिवसही पूर्ण झाले होते. मात्र, कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया आहे त्या टप्यावर ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत स्थगित करण्याच्या शासनाच्या २४ फेब्रुवारी २०२१ रोजीच्या आदेशानुसार निवडणूक प्रक्रिया थांबविण्यात आली होती.

दरम्यान, शासनाने निवडणुकीला स्थगिती दिलेली मुदत संपुष्टात आल्याने आणि निवडणुका पुढे ढकललेल्या कालावधीपासून सहा महिन्यांच्या आत निवडणूक घेणे आवश्यक असल्याने महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणे यांच्या वतीने नव्याने सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार सोमवार (ता. २०) व मंगळवारी (ता. २१) सकाळी ११ ते ३ या वेळेत खंडाळा तहसीलदार कार्यालयातील निवडणूक कार्यालयात नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची मुदत आहे. त्याच दिवशी दुपारी ३.३० वाजता दाखल अर्जांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 

बुधवारी (ता. २२) अर्जाची छाननी प्रक्रिया, तर गुरुवारी (ता. २३) सकाळी ११ वाजता वैध ठरलेल्या अर्जांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ता. २३ सप्टेंबर ते ता. ७ ऑक्टोबर या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. निवडणूक रिंगणातील उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करणे व चिन्ह वाटप (ता. ८) ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजेपर्यंत होणार आहे. आवश्यक वाटल्यात ता. १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान घेण्यात येणार आहे. ता. १९ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. त्याच दिवशी विजयी उमेदवार घोषित करण्यात येणार आहेत. 

कारखान्याच्या एकूण २१ संचालकांपैकी व्यक्ती उत्पादक खंडाळा, शिरवळ, बावडा, भादे व लोणंद या पाच गटांमध्ये प्रत्येकी ३ असे एकूण १५ संचालक, महिला राखीव गटातून दोन महिला संचालक, तर संस्था व बिगर उत्पादक सभासद प्रतिनिधी, अनुसूचित जाती/जमाती प्रतिनिधी, इतर मागास मतदार प्रवर्ग प्रतिनिधी, भटक्या विमुक्त जाती जमाती व विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी मतदारसंघातून प्रत्येकी एक संचालक असे एकूण २१ निवडून द्यायचे आहेत.

 इच्छुकांनी उमेदवारी अर्जाची १०० रुपये फी भरून अर्ज खरेदी करून वेळेत अर्ज दाखल करावेत. अनुसूचित जाती जमातीच्या उमेदवारांसाठी ३०० रुपये, तर इतर उमेदवारांसाठी १००० रुपये अनामत शुल्क राहील. मतदार यादी उपविधी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात सशुल्क मिळेल. मतदानाचा दिवस वगळून निवडणूक कामकाज सार्वजनिक व शासकीय सुटी दिवशी बंद राहील, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा फलटणचे प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com