पीओपीवरील बंदी मागे; आदित्य ठाकरेंचा कुंभार समाजाला दिलासा

कुंभार समाजाकडून प्लॅस्टर ऑफ पॅरिस व शाडू मातीपासून देवादिकांच्या मुर्ती जानेवारी ते ऑगस्ट महिना अखेरपर्यंत बनवल्या जातात. मुर्ती पूर्णत: शाडू मातीची केल्यास मूर्तींना तडे जात असले कारणाने धार्मिक भावना दुखावू नयेत याकरीता शाडू व पीओपी मिश्रीत मूर्ती कुंभार समाजाकडून बनवल्या जातात.
Aditya Thackaray, Satej Patil
Aditya Thackaray, Satej Patil

कोल्हापूर : गणेशोत्सवात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मुर्तींवर घातलेल्या बंदीचा निर्णय मागे घेण्यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी यासंदर्भात भेटलेल्या शिष्टमंडळाला दिले होते. त्यानुसार त्यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या कानावर ही गोष्ट घातली. श्री. पाटील यांनी तातडीने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंशी दूरध्वनीवरून संपर्क साधून याबाबत चर्चा केली. यावर्षी करीता पीओपी मूर्तीवरील बंदी आदेश मागे घेत असल्याचे मंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितल्याने कुंभार समाजामध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

यावर्षी कोल्हापूर जिल्ह्यात महापूरामुळे कुंभार समाजबांधवांचे मोठे नुकसान झाले असून यातून सावरण्याकरीता कुंभार समाजाने बॅंकांकडून कर्जे काढून परंपरेनुसार
मूर्ती बनवण्याचे काम सुरु केले होते. यातच, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना प्रशासनाकडून बंदी घालल्याचा आदेश जारी केल्याने कुंभार समाजाच्या पायाखालची
वाळूच सरकली.

महाराष्ट्र कुंभार समाज महासंघाद्वारे कोल्हापूर जिल्हा कुंभार समाज कृती समितीचे माजी महापौर मारुतराव कातवरे, उदय निगवेकर, सतिश बाचणकर यांच्या नेतृत्वाखाली खासदार संजय मंडलिक यांची भेट घेतली. कुंभार समाजाकडून प्लॅस्टर ऑफ पॅरिस व शाडू मातीपासून देवादिकांच्या मुर्ती जानेवारी ते ऑगस्ट महिना अखेरपर्यंत बनवल्या जातात. मुर्ती पूर्णत: शाडू मातीची केल्यास मूर्तींना तडे जात असले कारणाने धार्मिक भावना दुखावू नयेत याकरीता शाडू व पीओपी मिश्रीत मूर्ती कुंभार समाजाकडून बनवल्या जातात.

परंतू, पर्यावरण आणि प्रदुषणच्या नावाखाली अश मूर्ती विक्री करण्यास बंदी घातली जात असल्याने कुंभार समाजाची नेहमीच अडचण होत असते. केंद्रीय प्रदुषण नियंत्रण व वनखाते बोर्ड, औरंगाबाद खंडपीठ आणि सर्वोच्च न्यायालयाचे पी.ओ.पी. मूर्ती विसर्जनाबाबतचे निर्देश पाहता पी.ओ.पी. मुर्ती विसर्जन करणेकरीता स्थानिक प्रशासनाने सार्वजनीक कुंड, हौद, कृत्रिम तलाव इ. ठिकाणी सोय करुन त्याठिकाण ती मूर्ती विसर्जित कराव्यात व विसर्जित झाल्यानंतर तयार होणारा गाळ पुन्हा कुंभार
समाजाने वापरावा.

मुर्ती रंगकाम करताना वॉटर बेस रंगांचा वापर करावा तसेच पो.ओ.पी. हे केमिकल नसून ते नैसर्गिक गौण खनिज-मातीचा भाग असल्याने पाण्यात ते विरघळते अशी मार्गदर्शके खंडपीठाकडून दिली असलेबाबतचे माहिती श्री. कातवरे यांनी खासदार मंडलिक यांना दिली. यापार्श्वभुमीवर, आज खासदार मंडलिक यांनी पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांची भेट घेवून त्यांना कुंभार समाजाची अडचणी लक्षात आणून दिल्या.

तसेच कुंभार बांधवांकडून गणेशमुर्तींचे काम अंतिम टप्यात आले असून हे सर्व त्यांनी बॅंकांची कर्जे काढून केली असल्याने त्यांना चालू वर्षाकरीता पीओपी मुर्तीबाबत
परवानगी मिळावी अशी विनंती केली. यासंदर्भात पालकमंत्री पाटील यांनी पर्यावरण मंत्री श्री. ठाकरे यांचेशी दुरध्वनीवरुन संपर्क साधून चर्चा केली असता, चालूवर्षी
करीता पीओपी मूर्तीवरील बंदी आदेश मागे घेत असल्याचे ठाकरे यांनी सांगितल्याने कुंभार समाजामध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com