तीन वर्षात पाचशे जणांचे प्राण वाचवणाराच पुरात वाहून गेला..

काल जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पुर आलेल्या भागात हा तरुण बचावकार्य करत होता.
तीन वर्षात पाचशे जणांचे प्राण वाचवणाराच पुरात वाहून गेला..
Heavy rain In Hingoli District News

हिंगोली ः तीन वर्षात जिल्ह्यात आलेल्या पुरात पाचशेहून अधिक जणांचे प्राण वाचवणारा तरुणच काल पुरात बचावकार्य करत असतांना वाहून गेला.  या जिगरबाज तरुणाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (In three years, five hundred lives were saved by the flood)  कळमनुरी तालुक्यातील येलकी येथील लखन गजभारे असे या तरुणाचे नाव आहे. गेल्या तीन वर्षात पाचेशेहून अधिक जणांचे पुराच्या पाण्यातून त्याने जीव वाचवले आहेत.

काल जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पुर आलेल्या भागात हा तरुण बचावकार्य करत होता. लोकांचे प्राण वाचवण्यासाठी धडपडत असतांना काळाने त्याच्यावरच घाला घातला. (Heavy Rain In Hingoli District) पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने लखन गजभारे पुरातत वाहून गेला.  पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने जिल्ह्यात आतापर्यंत एका चिमुकलीसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

हिंगोली जिल्ह्यात पावसाने हाहाकार उडाला आहे, कयाधू व पूर्णा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे.  आज सकाळी कळमनुरी तालुक्यातील येलकी येथील रहिवासी लखन गजभारे या युवकाचा मृतदेह देखील ग्रामस्थांना उसाच्या शेतात आढळून आला.  

काल पासून लखन येलकी गावच्या शिवारातील ओढ्यात वाहून गेला होता, मागील तीन वर्षापासून लखन लोकांना संकटकाळी मदत करायचा.  आजपर्यंत पाचशे जणांना पुराच्या पाण्यातून त्याने वाचविले होते. मात्र आज त्याला लोकांना वाचवताना आपला जीव गमावावा लागला. मागील दोन दिवसापासून लखन हा ओढ्याला आलेल्या पुरामुळे शेतात अडकलेल्या लोकांना काढण्यासाठी प्रयत्न करत होता.

मात्र काल सायंकाळी अचानक पाण्याचा अंदाज न आल्याने ओढ्याच्या पाण्यात तो वाहून गेला. ज्यात त्याचा मृत्यू झाला आहे. आज सकाळी पोलीस व ग्रामस्थांच्या शोध मोहिमेत उसाच्या शेतात लखन यांचा मृतदेह सापडला. लखनच्या मृत्युने येलकी गावासह परिसरावर शोकळा पसरली.

Edited By : Jagdish Pansare

Related Stories

No stories found.