जगाला `तालीबान`आणि महाराष्ट्राला धनुष्यबाणापासून धोका..
Bjp Mla Ranajagjeet singh paitl- Twitte News Osmanabad

जगाला `तालीबान`आणि महाराष्ट्राला धनुष्यबाणापासून धोका..

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल `कानाखाली लावली असती`, असे वादग्रस्त विधान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एका पत्रकार परिषदेत केले होते.

उस्मानाबाद ः केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक झाल्यानंतर राज्यभरात शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते समोरासमोर आले आहे. (Threat to the world from 'Taliban' and Maharashtra from bow and arrow) रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू असतांनाच आता सोशल मिडियावर देखील या दोन्ही पक्षाचे कार्यकर्तेच नाही, तर लोकप्रतिनिधी देखील एकमेकांना भिडल्याचे समोर आले आहे.

तुळजापूरचे भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी राणे यांच्या अटकेचा निषेध करतांना शिवसेनेची तुलना थेट तालीबानशी केली आहे. (Bjp Mla Ranajagjeetsingh Patil, Tuljapur) आपल्या अधिकृत ट्विवटर हॅन्डलवरून त्यांनी एक पोस्ट केली आहे. यात जगाला तालीबानपासून आणि महाराष्ट्राला धनुष्यबाणापासून धोका असल्याचे म्हटले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल `कानाखाली लावली असती`, असे वादग्रस्त विधान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एका पत्रकार परिषदेत केले होते. (Chief Minister Uddhav Thackeray) त्यांच्या या विधानमुळे शिवसेनेत प्रचंड संताप पसरला आणि त्याचे पडसाद राज्यभरात राणे यांच्या विरोधात आंदोलन, जोडे मारो, पुतळ्याचे दहन आणि घोषणाबाजीच्या रुपाने उमटले.

राज्य सरकारने देखील राणे यांच्या या वक्तव्याला चिथावणीखोर आणि कायदा व सुव्यवस्था बिघडवण्यास कारणीभूत ठरणारे म्हणत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. नाशिक पोलीस ठाण्यात राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर जन आशिर्वाद यात्रे निमित्त रत्नागिरीत असलेल्या राणे यांना पोलिसांनी अटक करून संगमेश्वर पोलीस ठाण्यात नेले. त्यानंतर तर राज्यातील वातावरण अधिकच चिघळले.

राणे यांच्या समर्थनार्थ भाजपचे कार्यकर्तेही रस्त्यावर उतरले. रस्त्यावरची ही लढाई आता सोशल मिडियावर देखील सुरू झाली आहे. भाजपचे  आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी या अटकेच्या कारवाईचा निषेध करतांना शिवसेनेवर टीका करणारे एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये राणापाटील यांनी शिवसेनेची तुलना थेट तालीबान्यांशी केली आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, जगाला तालीबानपासून आणि महाराष्ट्राला धनुष्यबाणापासून खरा धोका आहे. अटकेचा जाहीर निषेध.

Edited By : Jagdish Pansare

Related Stories

No stories found.