...तर नागपूर महानगरपालिका पुन्हा भाजपच्याच ताब्यात राहील !

प्रभागात बऱ्यापैकी वर्चस्व व नाव असलेल्यांना भाजपसोबत जोडले जात आहे. दुसरीकडे राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्याने काँग्रेसला मुसंडी मारण्याची शहरात मोठी संधी असल्याचे चित्र आहे. त्यातच चारचा प्रभागाचा निर्णय बदलण्यात आला आहे. एकल वॉर्ड काँग्रेसला फायदेशीर ठरतो हा इतिहास आहे.
NMC Nagpur
NMC Nagpur

नागपूर : विद्यमान नगरसेवक आणि इच्छुकांना महानगरपालिका निवडणुकीचे वेध लागले आहेत. भारतीय जनता पक्ष तयारीलाही लागला. आतापर्यंत चारच्या प्रभागामुळे भाजपचं गणित चांगलंच जमलं होतं. पण यावेळी ते नसल्यामुळे त्यांना जास्त परिश्रम करावे लागणार आहेत. एकल वॉर्ड पद्धती कॉंग्रेसच्या हिताची आहे. पण कॉंग्रेसचे नेते अद्यापही घराबाहेर पडलेले नाहीत. त्यामुळे कार्यकर्ते अस्वस्थ दिसत आहेत. हे असेच सुरू राहिले तर महानगरपालिका यावेळीही भाजपच्याच ताब्यात राहील, असे बोलले जात आहे. 
 
तब्बल पंधरा वर्षांपासून महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकत आहे. चारच्या प्रभागामुळे भाजपचे चांगलेच फावले होते. १०८ नगरसेवक निवडून आले असल्याने भाजप तशी बिनधास्त होती. मात्र भाजपला अँटि इन्कंबसीचा धोका निर्माण झाला आहे. चारच्या प्रभाग असल्याने निम्मे नगरसेवक घराच्या बाहेरच पडत नाही. त्यात कोरोना आणि निधीच्या कमतरतेमुळे मोठ्या प्रमाणात भाजप नगरसेवकांविषयी नाराजी आहे. भाजपचे केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणातून ही बाब समोरसुद्धा आली आहे. त्यामुळे सावध झालेल्या भाजपने आत्तापासून नवीन गडी हेरायला सुरुवात केली आहे. 

प्रभागात बऱ्यापैकी वर्चस्व व नाव असलेल्यांना भाजपसोबत जोडले जात आहे. दुसरीकडे राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्याने काँग्रेसला मुसंडी मारण्याची शहरात मोठी संधी असल्याचे चित्र आहे. त्यातच चारचा प्रभागाचा निर्णय बदलण्यात आला आहे. एकल वॉर्ड काँग्रेसला फायदेशीर ठरतो हा इतिहास आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांच्या गटागटांत विखुरलेल्या तसेच नाराज असलेल्या कार्यकर्त्यांना पुन्हा एकत्रित आणण्याची गरज आहे. मात्र याकडे कोणीच लक्ष देत नाही. 

प्रदेशाध्यक्षांची प्रतीक्षा 
नाना पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर संघटनेत मोठे फेरबदल होतील, काही नव्या दमाच्या तरुणांना जबाबदारी सोपवली जाईल, तसेच आपसातील गटबाजी व मतभेद दूर करतील, अशी अपेक्षा अनेकांना होती. मात्र तसे काहीही होताना दिसत नाही. पटोले यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसंदर्भात बैठक घेतली. सर्व नेत्यांना एकत्रित बोलावले. प्रत्येकाचे म्हणणे जाणून घेतले. मात्र राज्याच्या उपराजधानीत अद्याप त्यांनी कामाला सुरुवात केलेली नाही. विशेष म्हणजे पटोले यांनी नागपूरमधून लोकसभेची निवडणूक लढली आहे. त्यामुळे बहुतांश नेत्यांशी त्यांचा आधीच संपर्क झालेला आहे. कोण कामाचे, कोणी नाही याची त्यांना बारकाईने माहिती आहे. बेधडक स्वभावाचे नाना नागपूरपासून दोन हात लांब असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच पुन्हा उमेदवारी दाखल करायच्या शेवटच्या दिवसापर्यंत वाट बघायची काय, असेही बोलले जात आहे.
 Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com