राज्यात सर्वाधिक Covid-19 पॉझिटिव्हीटी ठाण्यात तर सर्वात कमी या जिल्ह्यात..

कोरोना (Covid-19) रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने महाराष्ट्राची (Maharashtra) चिंता वाढली आहे.
 Covid-19
Covid-19sarkarnama

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना (Covid-19) प्रादुर्भाव पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. यामुळे राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्णसंख्या ही कमालीची वाढू लागली आहे. त्यामुळे राज्यातील पॉझिटिव्हिटीचा दरात (corona positivity) कमालीची वाढ झाली आहे. राज्यात डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत सरासरी १.१९ टक्के पॉझिटिव्हिटी दर होता. मात्र, तो ११ जानेवारीपर्यंत सरासरी २१.३९ वर पोहोचला आहे.

 Covid-19
मराठी माणसाचे प्रश्न सोडवणार का?;पाहा व्हिडिओ

ठाणे, मुंबई, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर राज्यात सर्वाधिक आहे. त्यात ठाण्यात ३६ जिल्ह्यांपैकी सर्वाधिक म्हणजे २९.५८ टक्के पॉझिटिव्हिटी दर आहे. त्यापाठोपाठ मुंबईत २८.२३, पालघर २४.९३ आणि रायगड २३.३४ यांचा क्रमांक लागतो.

 Covid-19
रूपालीताई स्टंटबाजी नको; संजय राठोडांच्या विरोधात गुन्हा दाखल करून दाखवा

राज्याचा २५ डिसेंबरपर्यंत पॉझिटिव्हिटी दर फक्त ०.८२ पर्यंत होता. उर्वरित राज्यातील जिल्ह्यांमध्ये साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर नियंत्रणात आहे. सर्वात कमी पॉझिटिव्हिटी दर हा मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात १०.४३ एवढा आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी-जास्त होत असल्याने पॉझिटिव्हिटी दरातही चढ-उताराची नोंद होत आहे. दरम्यान, बुधवारी राज्यात ४६,७२३ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली.

कोरोनामुळे महाराष्ट्र ठरत आहे 'चिंतेचे राज्य'

आजघडीला राज्यात २, लक्ष ६ हजार ४६ सक्रिय कोरोना रुग्ण आणि पॉझिटिव्हिटी दर २१.३९ टक्के आहे. यामुळे महाराष्ट्र हे ‘चिंतेचे राज्य’ बनले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांनी ट्रॅकिंग, ट्रेसिंग, चाचणी आणि लसीकरणावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी लागू असलेल्या प्रतिबंधांची कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, राज्याचे आरोेग्य मंत्री हे वारंवार कोरोना नियमाचे पालन करण्याचे आवाहन राज्यातील जनतेला करत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com