कारवाई एवढी कडक असेल की, परत कोणी पेपर फोडण्याचे धाडस करणार नाही

पेपरफुटी प्रकरणामुळे परीक्षा रद्द करण्याची मागणी होऊ लागली आहे.
Ajit Pawar
Ajit Pawarsarkarnama

पुणे : राज्यातील आरोग्य विभागातील (Department Of Health) रिक्त पदे ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) भरणे अशक्य आहे. कारण एवढ्या मोठ्या पदांसाठीच्या सगळ्या परीक्षा एमपीएससीमार्फत घेणे अवघड आहे. परत आरोग्य विभागातील भरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणातील दोषी व्यक्तींवर कडक कारवाई केली जाईल. ही कारवाई एवढी कडक असेल की, परत कोणी असे पेपर फोडण्याचे धाडस करणार नाही, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले. ते शुक्रवारी (ता.10 डिसेंबर) पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते.

Ajit Pawar
पुणे विद्यापीठाचं मोठं पाऊल; विद्यार्थ्यांना आशा भोसले, नवाजुद्दीन देणार धडे

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी आरोग्य विभागातील रिक्त जागा भरण्यासाठीचे चांगले नियोजन केले होते. राज्य सरकारने याबाबत घेतलेले निर्णय स्वीकारले पाहिजेत. पण काहींनी या निर्णयांना फाटा देत चुकीचे कामे करण्याचा प्रयत्न केला आहे. ज्याच्या चुका असतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. कारवाई एवढी कडक केली जाईल की, परत कोणी असे करण्याची हिंमत करणार नाही, असे पवार यांनी यावेळी ठणकावले.

Ajit Pawar
'सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्तेमुळे राष्ट्रवादीची माती झाली'

पवार म्हणाले, "पेपरफुटी प्रकरणामुळे ही परीक्षा रद्द करण्याची मागणी होऊ लागली आहे. मात्र, याबाबत सर्व बाबींचा विचार करून आणि या संबंधित सर्व घटकांशी चर्चा करुन मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकमताने निर्णय घेतला जाईल. हा निर्णय राज्यस्तरावरचा असेल. हा निर्णय घेताना परीक्षार्थी उमेदवारांचे नुकसान होणार नाही, याचीही काळजी घ्यावी लागणार आहे." असे मत त्यांनी व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com