कोरेगाव भीमा अभिवादन कार्यक्रमाची जबाबदारी आता सामाजिक न्याय विभाग घेणार

शौर्यदिन अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
Dhananjay Munde

Dhananjay Munde

Sarkarnama

मुंबई : शौर्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा (Koregaon Bhima) येथील ऐतिहासिक विजयस्तंभाच्या परिसरात मूलभूत सोयी सुविधा, सुशोभिकरण व अन्य विकासाची तसेच, शौर्य दिन व अन्य अल्पकालीन व दीर्घकालीन उपक्रमांचे आयोजन व नियोजन यापुढे सामाजिक न्याय विभागामार्फत (The Department of Social Justice) करण्यात येणार आहे. येत्या 1 जानेवारी रोजी आयोजित केल्या जाणाऱ्या शौर्यदिन अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आज (ता.14 डिसेंबर) मंत्रालयात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित सर्व अधिकाऱ्यांच्या पार पडलेल्या बैठकीत मुंडे यांनी ही माहिती दिली.

Dhananjay Munde

आमचे दुकान बंद पाडण्याच्या नादात नाना स्वतःचेच दुकान बंद करून बसले…

यावेळी विजयस्तंभ ही एक ऐतिहासिक धरोहर असून लाखो अनुयायांचे प्रेरणा स्थळ आहे. या स्थळाचा विकास व सुशोभीकरण केले जावे यासाठी 100 कोटी रुपयांपर्यंतचा बृहत विकास आराखडा तयार करून मान्यतेसाठी एक महिन्याच्या आत सादर करावा, त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी माहिती मुंडे यांनी दिली. तसेच, हा बृहत विकास आराखडा तयार करण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी व समाज कल्याण आयुक्त यांची समितीही गठीत करण्यात आली आहे. शिवाय एक जानेवारीच्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठीही एक समिती स्थापन करण्यात आली. या समितीमध्ये जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, पुण्याचे पोलीस आयुक्त, बार्टीचे महासंचालक धम्मज्योति गजभिये, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आदी प्रमुख अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे.

Dhananjay Munde

अदर पूनावालांची लहान मुलांसाठी 'गुड न्युज'

दरम्यान, विजयस्तंभ व परिसराचा विकास करताना भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण केली जावी यासाठी जिल्हाधिकारी पुणे, यांच्या मार्फत भूसंपादन प्रक्रियेचा 30 टक्के निधी तातडीने वितरित करण्याच्या सूचना या बैठकीत मुंडेंनी दिल्या. त्यामुळे आता या प्रक्रियेला वेग येणार आहे.

अभिवादन कार्यक्रमाचे लाइव्ह प्रक्षेपण होणार

दरवर्षी 1 जानेवारीला देशभरातून अनुयायी कोरेगाव भीमा येथे अभिवादन करण्यासाठी येतात, त्यांना आवश्यक सोयी सुविधा तसेच, विजयस्तंभ व परिसराचा विकास कमीत कमी वेळेत केला जावा यासाठी व्यापक प्रयत्न केले जातील, या अनुषंगाने नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले आहे. यापुढे शौर्यादिनाचे आयोजन व नियोजन देखील सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत केले जाणार असून, येणाऱ्या शौर्यदिन अभिवादन कार्यक्रमाचे काटेकोरपणे नियोजन केले जावे. तसेच, या अभिवादन कार्यक्रमाचे लाइव्ह प्रक्षेपण करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना देखील मुंडे यांनी पोलीस, महसूल व अन्य संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत. तसेच, विजयस्तंभापुढे होणाऱ्या सर्व अल्पकालीन व दीर्घकालीन उपक्रमांचे आयोजन करण्याची जबाबदारी देखील सामाजिक न्याय विभागाने घेतली आहे.

Dhananjay Munde

अशा झाल्या गमती-जमती; पाच मते अवैध, दोघांची मतपत्रिका कोरीच...

या बैठकीस विभागाच्या अपर मुख्य सचिव जयश्री मुखर्जी, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, जिल्हा परिषद मुख्याधिकारी आयुष प्रसाद, सा. न्या. विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे, गृह विभागाचे सहसचिव संजय खेडकर, पुणे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त संगीता डावखरे आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com