कोरोनापासून वाचण्यासाठी ठाकरे सरकारच्या नव्या सूचना

कोविड 19 या साथीच्या रोगाकरिता आयुर्वेद, युनानी व होमिओपॅथी उपचाराबाबत वैद्यकिय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने काढलेल्या शासन निर्णयामध्ये काही मार्गदर्शक सूचना जनतेला केल्या आहेत. त्यालाराज्य शासनाने मान्यता दिली आहे.
CM Uddhav Thackeray
CM Uddhav Thackeray

सातारा : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी रूग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. अशा परिस्थितीत कोविड 19 या साथीच्या रोगाकरिता आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी, योग चिकित्सा पध्दतीचा अवलंब करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने नवीन सूचना दिल्या आहेत. या उपचार पद्धतींचा अवलंब करण्यासाठी टास्क फोर्स ऑन आयुष फोर कोविड 19 ही समिती गठीत केली आहे. या समितीच्या सूचनेनुसार कोरोनापासून वाचण्यासाठी आयुष व होमिओपॅथिक उपचार करताना कोणती काळजी घ्यावी, याचा शासन निर्णय वैद्यकिय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने काढला आहे. 

कोविड 19 या साथीच्या रोगाकरिता आयुर्वेद, युनानी व होमिओपॅथी उपचाराबाबत वैद्यकिय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने काढलेल्या शासन निर्णयामध्ये काही मार्गदर्शक सूचना जनतेला केल्या आहेत. त्याला राज्य शासनाने मान्यता दिली आहे.  कोरोना रोगापासून वाचण्यासाठी हे उपाय करा, असे म्हटले आहे.

यामध्ये सामान्य प्रतिबंधात्मक उपायांत :  वैयक्तिक स्वच्छतेचे व्यवस्थित पालन करावे, वारंवार साबणाने हात वीस सेकंदपर्यंत धुवावे, श्‍वसन विषयक निर्णय पाळावेत, खोकताना व शिंकताना तोंड झाकावे, आजारी व्यक्ती किंवा सर्दी, खोकला आदी आजाराची लक्षणे सलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा, जिवंत प्राण्यांशी संपर्क व कच्चे न शिजवलेले मांस खाणे टाळावे, पशुपालन गृह तसेच जिवंत पशु विक्री केंद्र किंवा कत्तल खाने या ठिकाणी प्रवास टाळावा. 

आयुष उपाय योजनांचे पालन करताना : भोजन ताजे उष्ण व पचायला हलके असावे. अख्खी धान्ये आणि ऋतूनुसार भाज्या आदींचा समावेश असावा. तुळशीची पाने, ठेचलेले आले व हळद ही द्रव्ये पाण्यात उकळून ते पाणी वारंवार पिणे फायदेशीर आहे. सर्दी व खोकल्यासाठी चिमूटभर काळीमिरी चूर्ण मधातून सेवन करणे फायदेशीर आहे. तसेच अशा लक्षणांमध्ये तुळस, गुडुची, गुळवेल, आले आणि हळद या सामान्य औषधी वनस्पती उपयुक्त आहेत. थंड, फ्रिजमध्ये ठेवलेले व पचायला जड पदार्थ खाणे टाळणे हितकारक आहे.

थंड वाऱ्याचा थेट संपर्क टाळणे हे नेहमी फायदेशीर आहे. पर्याप्त विश्रांती व वेळेत झोपणे हितकारक आहे. प्रशिक्षित योग तज्ञांच्या मार्गदर्शनाखीा योगासने व प्राणायाम यांचा सराव करावा. मुगाचे कढण, सूप, पाणी, मुग डाळ पाण्यात उकळवून तयार केलेले मुगाचे गरण कढण, सूप, पाणी प्यावे. ते पोषक व पथ्यकर आहे. सुवर्ण दुग्ध, दुध 150 मिलिलिटर गरम दुधात अर्धा चमचा हळद व अर्धा चमचा सुंठीचे चूर्ण मिसळून हे दूध दिवसातून एकदा किंवा दोनदा प्यावे. 

रोगप्रतिकार शक्ती वाढीसाठी व रोग प्रतिबंधासाठी आयुर्वेद, युनानी व होमिओपॅथी उपचार :  आयुर्वेद : संशमनी वटी (500 मिलिग्रॅम) एक गोळी दिवसातून दोनदा - 15 दिवस  आयुष क्वाथ : तुळस चार भाग, सूंठ दोन भाग, दालचिनी दोन भाग व काळीमिरी एक भाग या द्रव्यांच्या भरड चुर्णाने फांट तयार करणे. ( वरिल औषधींचे तीन ग्रॅम भरड चूर्ण शंभर मिलिलिटर उकळलेल्या पाण्यात मिसळून पाच ते सात मिनिटे झाकून ठेवणे व गाळूण ते पाणी पिणे. हा फांट सकाळ, संध्याकाळ ताजा बनवून 15 दिवसांसाठी सेवन करावा.

च्यवनप्राश दहा ग्रॅम सकाळी सेवन करावे. मधूमेही रूग्णांनी साखर विरहित, शुगर फ्री च्यवनप्राश सेवन करावे.  सोपे आयुर्वेदिक चिकित्सा उपक्रम : नस्य- नाकावाटे औषध टाकणे, सकाळ व संध्याकाळ दोन्ही नाकपुड्यांमध्ये तिळतेल, खोबरेल तेल किंवा तूप हे बोटाने लावावे, प्रतिमर्श नस्य करावे. तेलने गंडुश, गुळण्या व गरम पाण्याने गुळण्या करणे, तोंडमध्ये एक मोठा चमचा तिळतेल, खोबरेल तेल घ्यावे, हे तेल न गिळता दोन ते तीन मिनिटे गुळण्या कराव्यात व त्यानंतर ते तेल थूंकावे. गरम पाण्याने चूळ भरावी, असे दिवसातून एकदा किंवा दोनदा करावे. गरम पाण्याने देखील एकदा किंवा दोनदा गुळण्या कराव्यात.

 
युनानी औषधी : काढा, जोशंदा- बिहीदाना पाच ग्रॅम, बर्गे गावजबान सात ग्रॅम, उन्नाब सात दाणे, सपीस्तान सात दाणे, दालचिनी तीन ग्रॅम, बनपशा पाच ग्रॅम याचा काढा करणे. या घटक द्रव्यांना 250 मिलिलिटर पाण्यात 15 मिनिटे उकळावे व गरम असताना चहाप्रमाणे दिवसातून एक किंवा दोन वेळा 15 दिवसांकरित सेवन करावे. खमीरा मरवारीद : दुधासोबत पाच ग्रॅम दिवसातून दोनदा सेवन करावे (मधुमेही रूग्णांनी सेवन करू नये).  होमिओपॅथीक औषधी : अर्सेनिकम अल्बम 30 - चार गोळ्या उपाशीपाटी दिवसातून दोनदा, असे तीन दिवस सलग सेवन करावे. एका महिन्याच्या अंतराने पुन्हा हा तीन दिवसांचा औषधाचा कोर्स करावा. 

कोविड 19 सारखी लक्षणे असाणाऱ्या इतर आजारांसाठी आयुर्वेद, युनानी व होमिओपॅथी उपचार : आयुर्वेदिक औषधी : टॅबलेट आयुष 64 (500 मिलिग्रॅम) दोन गोळ्या दिवसातून दोन वेळा 15 दिवस सेवन करणे. अगस्त हरितकी पाच ग्रॅम दिवसातून दोन वेळा पाण्यासोबत 15 दिवस सेवन करावे. अणूतेल, तीळतेल -दोन थेंब प्रतिदिन सकाळी प्रत्येक नाकपुडीत टाकणे. ताजी पुदिन्याची पाने किंवा पाण्यात उकळून त्याची वाफ दिवसातून एकदा किंवा दोनदा घेणे. 

युनानी औषधे : अर्के अजीब हे औषध पाच थेंब अर्धा ग्लास पण्यात मिसळून गुळण्या कराव्यात. हा उपक्रम 15 दिवस करावा. हे मिश्रण घरीदेखील प्रत्येकी पाच ग्रॅम सत्ते अजवाइन, सत्ते पुदिना व सत्ते कपूर, कफूर एकत्रित करू तयार करता येते. 

होमिओपॅथी औषधी : अर्सेनिकम अल्बम 30 च्या चार गोळ्या उपाशी पोटी दिवसातून दोनदा असे तीन दिवस सलग सेवन करावे. एक महिन्याच्या अंतराने पुन्हा हा तीन दिवसाचा औषधांचा कोर्स करावा. तसेच ब्रायोजिनया अल्बा, हस टॉक्‍सीको डेड्रॉन, बेलॉडोना जेलसेमियम, युप्याटोरियम परफॉलिएटम, ही औषधे देखील सर्दी, खोकला, फ्लू समान रोगांमध्ये चिकित्सेसाठी उपयुक्त ठरतील.  (ही औषधे तज्ञ आयुर्वेदिक, युनानी व होमिओपॅथीलक डॉक्‍टरांच्या सल्ल्यानंतरच घ्यावीत) 

कोविड 19 पॉझिटिव्ह अलाक्षणिक, चिकित्सालयीन तपासणीनुसार स्थित असणाऱ्या व इतर वर्तमान गंभीर व्याधी रहित रूग्णांकरिता प्रस्थापित चिकित्सेला पुरक आयुर्वेद व होमिओपॅथी उपचार :  आयुर्वेदिक औषधी : टॅबलेट आयुष 64 - 500 मिलिग्रॅम दोन गोळ्या दिवसातून दोन वेळा 15 दिवस सेवन कराव्यात. किंवा टॅबलेट सुदर्शन घनवटी 250 मिलिग्रॅम : दोन गोळ्या दिवसांतून दोन वेळा 15 दिवस सेवन करणे. अगस्त्य हरितकी पाच गॅम दिवसातून दोन वेळा गरम पाण्यासोबत 15 दिवस सेवन करणे. 

सोपे आयुर्वेदिक चिकित्सा उपक्रम : सोपे आयुर्वेदिक चिकित्सा उपक्रम : नस्य- नाकावाटे औषध टाकणे, सकाळ व संध्याकाळ दोन्ही नाकपुड्यांमध्ये तिळतेल, खोबरेल तेल किंवा तूप हे बोटाने लावावे, प्रतिमर्श नस्य करावे. तेलने गंडुश, गुळण्या व गरम पाण्याने गुळण्या करणे, तोंडमध्ये एक मोठा चमचा तिळतेल, खोबरेल तेल घ्यावे, हे तेल न गिळता दोन ते तीन मिनिटे गुळण्या कराव्यात व त्यानंतर ते तेल थूंकावे. गरम पाण्याने चूळ भरावी, असे दिवसातून एकदा किंवा दोनदा करावे. गरम पाण्याने देखील एकदा किंवा दोनदा गुळण्या कराव्यात. 

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com