कोरोनावर एक नव्हे तीन लसींचे परिक्षण; हिरवा कंदील मिळताच उत्पादन

आत्मनिर्भर भारत हा आता केवळ शब्द राहिला नसून १३० कोटी भारतीयांच्या जीवनातील तो मंत्र बनला आहे, असे सांगतानाच पंतप्रधानांनी शेतकरी, गरीब वर्ग आणि ग्रामीण भागाच्या आत्मनिर्भरतेशिवाय याची कल्पनाच अपूर्ण असल्याचे अधोरेखित केले. देशाच्या अखंडतेबरोबर खेळ करणाऱ्यांना भारताच्या लष्कराने सीमेवर सणसणीत प्रत्युत्तर दिले आहे.
PM modis indipendance day speech news
PM modis indipendance day speech news

दिल्ली : कोरोना महामारीवर अक्सीर इलाज ठरणाऱ्या एक नव्हे तीन तीन लसींच्या परीक्षणाची प्रक्रिया भारतात सुरू आहे. वैज्ञानिकांनी हिरवा कंदील दाखविताच तिचे उत्पादन मोठ्या प्रमाणात करण्याचे नियोजनही झाले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले.

७४ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधानांनी 'नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन' आणि १०० कोटी रुपयांची तरतूद असलेल्या 'राष्ट्रीय पायाभूत सुविधा संजाल' या महत्त्वाकांक्षी योजनांचीही घोषणा केली. देशातील प्रत्येक म्हणजे सहा लाख गावांना ऑप्टिकल फायबर केबल नेटवर्कने जोडण्याची योजना अतिशय वेगाने चालू असून ती प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले.

आत्मनिर्भर भारत हा आता केवळ शब्द राहिला नसून १३० कोटी भारतीयांच्या जीवनातील तो मंत्र बनला आहे, असे सांगतानाच पंतप्रधानांनी शेतकरी, गरीब वर्ग आणि ग्रामीण भागाच्या आत्मनिर्भरतेशिवाय याची कल्पनाच अपूर्ण असल्याचे अधोरेखित केले. देशाच्या अखंडतेबरोबर खेळ करणाऱ्यांना भारताच्या लष्कराने सीमेवर सणसणीत प्रत्युत्तर दिले आहे. अयोध्येतील प्रस्तावित राममंदिराचाही उच्चार पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून केला.

लाल किल्ल्यावरून सलग सातव्या वेळेस संबोधित करणारे पहिले बिगर कांग्रेसी पंतप्रधान व लोकशाही पद्धतीने निवडून येऊन देशात (केंद्र व राज्य) सर्वाधिक काळ सरकार चालविणारे लोकप्रतिनिधी असाही विक्रम मोदी यांनी आज केला.

कोरोना महामारीमुळे यंदा नेहमीपेक्षा कमी म्हणजे सुमारे ४ हजार जणांच्या उपस्थितीत लाल किल्ल्यावर स्वातंत्र सोहळा पार पडला. तत्पुर्वी मोदींनी राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली.

भाषणातील ठळक मुद्दे

-  देशाच्या अखंडतेचे रक्षण करण्यासाठी भारत काय करू शकतो हे संपूर्ण जगाने नुकतेच लद्दाखमध्ये प्रत्यक्ष पाहिले आहे. लदाख हा देशातील पहिला कार्बन उत्सर्जनमुक्त प्रदेश बनेल असे प्रयत्न सुरू आहेत. 

- नेशनल डिजिटल हेल्थ मिशन ही योजना देशाच्या आरोग्य क्षेत्रात क्रांती आणणारी ठरेल. यात प्रत्येक नागरिकाला त्याच्या प्रकृती आणि आरोग्याबद्दलचे डिजिटल कार्ड दिले जाईल आणि त्यात त्याच्यावर पूर्वी झालेल्या वैद्यकीय उपचारांची समग्र माहिती असेल.

- भारताच्या थेट विदेशी गुंतवणुकीलामध्ये विक्रमी १८ टक्के वाढ झाली असून एफडीआय आणि परकीय चलन गंगाजळीने सारे विक्रम मोडले आहेत.

- २०१४ पूर्वी देशातील जेमतेम पाच डझन ग्रामपंचायतींमध्ये ऑप्टिकल फायबर केबल नेटवर्क पोचले होते. गेल्या ५ वर्षांमध्ये दीड कोटी ग्रामपंचायती या तंत्रज्ञानाने जोडल्या गेले असून पुढच्या १ हजार दिवसांमध्ये देशातील सर्वच्या सर्व ६ लाख ग्रामपंचायती संपूर्णपणे डिजिटल प्रणालीने जोडण्याचा संकल्प माझ्या सरकारने केला आहे.

- राष्ट्रीय पायाभूत संरचना ‘संजाल' (नॅशनल इंफ्रास्ट्रक्चर पाइपलाइन) या शंभर कोटी गुंतवणुकीच्या योजनेकडेही देश वेगाने पुढे सरकत आहे. रस्ते आणि रेल्वे, बंदरे व विमानतळ यामध्ये एकमेकांना जोडून काम केले गेले तर विकासाला मोठीच चालना मिळू शकते ही कल्पना यामागे आहे.

- सात कोटी लोकांना मोफत गॅस सिलेंडर, शिधापत्रिकेची सक्ती न करता ८० कोटी लोकांना दर महिन्याला मोफत रेशन, ९० कोटी गरिबांच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा करणे, २२ कोटी महिलांसह ४० कोटी गरिबांना बँक खाती उघडून देणे यासारख्या पूर्वी केवळ 'कल्पनावत' वाटणाऱ्या गोष्टी गेल्या सहा वर्षांमध्ये प्रत्यक्षात उतरल्या आहेत.

- ११० हून जास्त जिल्हे निवडून तेथे रोजगार, आरोग्य आणि शिक्षणाच्या उत्तम सुविधा निर्माण करण्याचे प्रयत्न वेगवान आहेत.

- देशातील शेतकऱ्यांना दर्जेदार आधुनिक पायाभूत सुविधा मिळण्यासाठीचा व  एक लाख कोटी तरतूद असलेला ‘एग्रीकल्चर इनफ्रास्ट्रक्चर फंड’ हा निधी स्थापन करण्यात आला आहे.

- हजारो देशवासीयांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मागच्या वर्षी पंचवीस हजार कोटींच्या एका स्वतंत्र निधीची रचना करण्यात आली. गृहकर्जाचे हप्ते वेळेवर भरणाऱ्यांना या काळात इएमआयवर सहा लाख रुपयांपर्यंतची सूट प्रथमच मिळाली आहे.

- कोरोना संकटकाळात एप्रिलपासूनच्या तीन महिन्यांमध्ये कोट्यावधी महिलांच्या जनधन खात्यामध्ये तीस हजार कोटी थेट जमा करण्यात आले आहेत.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com