बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेविरोधात तहसीलदार संघटना आक्रमक

Bacchu Kadu|Solapur|Prahar: जनतेने आपले काम व अर्ज थेट आमच्याकडे द्या आपली कामे प्राधान्याने करण्यात येईल, असे तहसीलदार संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेविरोधात तहसीलदार संघटना आक्रमक
Bacchu KaduSarkarnama

मंगळवेढा : महाविकास आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi) शिक्षण राज्यमंत्री असलेल्या बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या प्रहार (Prahar) संघटनेच्या सोलापूर शहराध्यक्षांनी महसूल मधील अधिकाऱ्याला अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य तहसीलदार नायब तहसीलदार संघटनेच्या वतीने प्रहार संघटनेच्या कोणत्याही विषयावरील निवेदनावर कार्यवाही न करण्याचा पवित्रा घेतला आहे.

Bacchu Kadu
'एक्सप्रेस वे' वर पोलिसांना सापडले घबाड; त्या चार कोटींचे कोल्हापूर कनेक्शन?

या संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सुशील बेल्हेकर, सह. अध्यक्ष अमोल कुंभार यांच्या सहीने याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (DM Milind Shambharkar) यांना देण्यात आले. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी जाहीर कार्यक्रमात बोलताना प्रहार संघटनेच्या प्रत्येक तालुकाध्यक्षांनी आपापल्या तहसीलदारांना ठोका, असे चिथावणीखोर वक्तव्य जाहीर करत याची सुरुवात पंढरपूर व मोहोळच्या तहसीलदाराना ठोकून करा असे वक्तव्य केले. सदरचे चित्रीकरण सुरू असून मला कोण काय करत नाही, अशी मग्रूर भाषा वापरली सदर चित्रीकरण सोशल मिडियातून समाजमाध्यमात पसरवले गेले आहे, असा आरोप तहसीलदार संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.

Bacchu Kadu
पिंपरी आयुक्तांची पाटिलकी, भाजपचा अर्थसंकल्पच फेटाळला

तहसीलदार हे अर्धन्यायिक कामकाज करत असताना अनेक निर्णय घेतात अशा परिस्थितीत एखाद्या व्यक्तीच्या विरोधात निर्णय झाल्यास अशाप्रकारे चिथावणी देऊन बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करण्याबाबत भडकावणे, हे बेकायदा, बेजबाबदार वर्तन असून कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रहार आयोजित कोणत्याही सभेमध्ये आमचा सदस्य सहभागी होणार नाही, असे सांगत जनतेने आपले काम व अर्ज थेट आमच्याकडे द्या आपली कामे प्राधान्याने करण्यात येईल, अशी भुमिकाही या निवेदनात स्पष्ट करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in