तडीपार गुंडांना पुढे करत सरकारकडून आवाज दाबण्याचा प्रयत्न; मेटेंचा घणाघात..

सरकारची गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही, आम्ही बांगड्या भरलेल्या नाहीत, शांत बसणार नाही, असा इशाराही मेटे यांनी दिला.
Mla vinayk mete news Aurangabd
Mla vinayk mete news Aurangabd

औरंगाबाद : मराठा क्रांती संघर्ष मोर्चाच्या वतीने २६ जून रोजी लढा आरक्षणाचा संघर्ष मेळावा घेणार आहे. याच मेळाव्या संदर्भात गुरुवारी पडेगाव येथे नियोजनासाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीत राज्य सरकारने तडीपार गाव गुंडांना पुढे करत बैठक उधळण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी केला. (Tadipar goons trying to silence the voice maratha Community government, Say,s Mete) सरकार गुंडांच्या माध्यमातून मराठा समाजाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचेही ते म्हणाले.  आरोप आमदार विनायक मेटे यांनी पत्रकार परिषदेत केला.

विनायक मेटे म्हणाले की, संघर्ष मेळावा कशा पद्धतीने आयोजित केला पाहिजेत, व इतर महत्त्वाच्या विषयावर ही बैठक घेत असताना काही गाव गुंड बैठकीत घुसले. (Mla Vinayk Mete) तडीपार असलेल्या या गाव- गुंडांनी आमचे शहराध्यक्ष उमाकांत मखाने यांचा मुलगा डॉ.अभिमन्यू यांना मारहाण केली. (Maratha Sanghrsh Kranti Morcha) मागील सरकार मध्ये तुम्ही शिव स्मारकाचे अध्यक्ष होता, भूमिपूजनच्या वेळी तुमचा अपमान झाला तो तुम्ही का सहन केला? असे विचारत काही तरुण बैठकीच्या ठिकाणी गोंधळ घालत आले.

हे सरकारी पक्षाचे गाव गुंड होते, कोणाच्या तरी सांगण्यावरून पूर्वनियोजित मारहाणीचा प्रकार होता.  सरकारला मराठा समाजाचे प्रश्न सोडवता येत नाही,  आरक्षण टिकवता येत नाही. जे लोक मराठा आरक्षणासाठी आंदोलन करू पाहतात त्यांना आंदोलन करू द्यायचे नाही, सभागृह चालू द्यायचं नाही, सभागृहात कोणाला बोलू द्यायचं नाही . तडीपार गुंडांना हाताशी धरून मराठा समाजाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करायचा, हा सगळा सरकारचा प्रयत्न असल्याचेही मेटे यांनी पत्रकारांना सांगितले.

मेळावा घेणारच..

मराठा समाज ना मोगलांना घाबरला होता, ना इंग्रजांना. कुणातही मराठ्यांना घाबरवण्याची ताकद नाही. उद्धव ठाकरे सरकार तुमच्या पक्षात गुंड लोक ठेवून तडीपार लोकांना मराठा समाजाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत असाल, तर समाज उसळल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही मेटे यांनी यावेळी दिला.  २६ जूनचा मेळावा हा सरकारच्या नाकावर टिच्चून घेणार आहोतच, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. 

घडलेला प्रकार मी स्वतः पोलीस आयुक्त डॉक्टर निखील गुप्ता यांची भेट घेऊन सांगितला आहे. अशा गावगुंडांना तुम्ही पाळत असाल तर वातावरण खराब होईल, त्यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, अशी मागणीही मेटे यांनी केली. सरकारची गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही, आम्ही बांगड्या भरलेल्या नाहीत,  शांत बसणार नाही, असा इशाराही मेटे यांनी दिला.  

गेल्या पंचवीस वर्षापासून मला संरक्षण मिळत होते. मात्र बीड येथे झालेल्या संघर्ष मेळाव्यानंतर पोलिसांचे आमच्या बद्दल वागणे बदलले आहे. मुंबई मधून बाहेर पडल्यानंतर देण्यात येणारे संरक्षण काढून घेतले आहे. यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. माझ्या बाबतीत काही गैरप्रकार झाला तर त्याला सरकार जबाबदार असेल असेही, मेटे म्हणाले. 

सारथीचे कार्यालय एकाच वेळी सुरू करावे..

राज्य सरकारतर्फे सारथीचे पहिले विभागीय कार्यालय कोल्हापूर येथे सुरु करण्यात येणार आहे.  याच सारथीचे मुख्य कार्यालय पुण्यात आहे.  सारथीच्या विभागीय कार्यालयाची खरी गरज मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, कोकण या ठिकाणी आहे. राज्यात भेदभाव करू नये सर्व ठिकाणी एकाच वेळी विभागीय कार्यालय सुरू, करावेत, अशी मागणीही मेटे यांनी केली. २६ जून रोजी होणाऱ्या आरक्षण संघर्ष मेळाव्या च्या पूर्वी मोटरसायकल रॅली काढण्यात येईल.  या मेळाव्यास तीन ते चार हजार लोक येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com