सुभाष देसाईंनी `संभाजीनगर`करून दाखवले; दौऱ्याच्या कार्यक्रमात दहावेळा उल्लेख..

आगामी महापालिका निवडणुकीच्या आधी शहराचे नाव संभाजीनगर करण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून सुरू असल्याचे यावरून स्पष्ट होते.
सुभाष देसाईंनी `संभाजीनगर`करून दाखवले; दौऱ्याच्या कार्यक्रमात दहावेळा उल्लेख..
gardiaun minister Subhash Desai- Meeting In Aurangabad News

औरंगाबाद ः राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी हीच ती योग्यवेळ असल्याचे सांगत औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर लवकरच करणार असल्याचे काही दिवसांपुर्वी सांगितले होते. (Subhash Desai performed 'Sambhajinagar'; Mentioned ten times in the tour program.) राज्यात महाविकास आघाडी सरकार असल्यामुळे औरंगाबादचे नामांतर शक्य नाही, असा अंदाज वर्तवला जात असला तरी शिवसेनेकडून मात्र नामांतराच्या जोरदार हालचाली सुरू आहेत.  

उद्या शुक्रवारी (ता.३) रोजी सुभाष देसाई हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याचा अधिकृत कार्यक्रम सुभाष देसाई यांच्या अधिकृत लेटरहेडवरून जाहीर करण्यात आला आहे. (Gardiuan Minister Subhash Desai, Aurangabad) यात देसाई यांनी एक नव्हे  तर तब्बल दहा वेळा `संभाजीनगर` असा उल्लेख केला आहे. विशेष कार्य अधिकारी नितीन शिंदे यांच्या स्वाक्षरीने जाहीर करण्यात आलेल्या दौऱ्याचा उल्लेखच पालकमंत्र्यांचा संभाजीनगर दौरा असा करण्यात आला आहे.

यापुर्वी मंत्रीमंडळ बैठकीतील निर्णय जाहीर करतांना औरंगाबाद विभागाशी संबंधित निर्णयाची माहिती सीएमओच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवर देखील औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर करण्यात आला होता. (Shivsena Change the Name of City) वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या खात्याशी संबंधित औरंगाबादच्या निर्णयात देखील संभाजीनगर असाच उल्लेख झाल्याने काॅंग्रेसची देखील या नामांतराला संमती आहे की काय? असा प्रश्न त्यावेळी उपस्थित करण्यात आला होता.

एकंदरित आगामी महापालिका निवडणुकीच्या आधी शहराचे नाव संभाजीनगर करण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून सुरू असल्याचे यावरून स्पष्ट होते. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काॅंग्रेस या तीन पक्षांचे सरकार सत्तेवर असल्यामुळे या दोन पक्षांची भूमिका काय? या संदर्भात देखील अनेकदा प्रश्न उपस्थित केले गेले. राष्ट्रवादीकडून संभाजीगरच्या विषयावर फारसे बोलले गेले नाही.

शिवसेनेकडून चाचपणी?

काॅंग्रेसने मात्र हा आमच्या समान विकास कार्यक्रमाचा भाग नाही, नाव बदलल्याने लोकांचे प्रश्न सुटणार आहेत का? असे म्हणत वेळ मारून नेली आहे. काॅंग्रेसचे नेते तथा महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संभाजीगनरवर आपले मत वेळोवेळी व्यक्त केले आहे.

तर दुसरीकडे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी मात्र औरंगाबादच्या संभाजीनगर करण्याची हीच योग्य वेळ आहे, सरकारमध्ये आम्ही एकत्रिपणे याचा निर्णय घेऊ, असे सांगत हा विषय आपल्या अजेंड्यावर असल्याचे वेळोवेळी दाखवून दिले होते. आता तर राज्याच्या सत्तेत उद्योगमंत्री असलेल्या सुभाष देसाई यांच्याकडून अधिकृतपणे दौऱ्याच्या कार्यक्रमात संभाजीनगर असा उल्लेख केला जात असल्याने पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.