पंकजा मुंडेच्या वाढदिवसाच्या बॅनरवरून राज्य आणि राष्ट्रीय नेतेही गायब..

आधी राज्यातील नेतृत्वाकडून आणि आता राष्ट्रीय पातळीवर देखील मुंडे भगिनींवर अन्याय केला जात असल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये निर्माण झाली.
पंकजा मुंडेच्या वाढदिवसाच्या बॅनरवरून राज्य आणि राष्ट्रीय नेतेही गायब..
Pankaja Munde Birthday Banner News Aurangabad

औरंगाबाद ः भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा उद्या वाढदिवस आहे. या निमित्ताने त्यांच्या समर्थकांकडून परळीत शुभेच्छा बॅनर लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या बॅनरवर स्व. गोपीनाथ मुंडे वगळता राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील भाजपच्या एकाही नेत्याला स्थान देण्यात आलेले नाही. (State and national leaders also disappear from Pankaja Munde's birthday banner.) मी राष्ट्रीय नेता असल्यामुळे माझे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा हे आहेत, असे सांगत पंकजा यांनी राज्यातील नेतृत्व झुगारले होते.

केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांना डावलल्यानंतर मुंडे भगिनींच्या समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी होती. यातून राजीनामा सत्र बीड व नगर जिल्ह्यात सुरू झाले होते. (Bjp Leader Pankaja Munde Maharashtra) मात्र यावर पंकजा मुंडे यांनी ते सगळे राजीनामे मी नामंजूर करत आहे, असे सांगत पडदा टाकला होता. परंतु आपल्या नेत्याला डावलले जात असल्याची सल आणि राग पंकजा समर्थकांमध्ये कायम असल्याचे दिसून आले आहे. समर्थकांचा राग आता राज्या बरोबरच राष्ट्रीय नेत्यांवर देखील असल्याचे त्यांनी लावलेल्या शुभेच्छ बॅनवरून दिसून आले आहे.

परळी विधानसभा निवडणुकीतील पराभव, त्यांनतर भाजपच्या कोट्यातील रिक्त विधान परिषद सदस्यपदासाठी अर्ज भरायला लावून त्यांच्याच समर्थक रमेशअप्पा कराड यांना संधी दिली गेली. त्यानंतर राज्यसभेवर संधी देण्याची वेळ आली, तेव्हा देखील पंकजा यांचेच समर्थक डाॅ. भागवत कराड यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले. त्यानंतर केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारात तरी खासदार प्रीतम मुंडे यांचा विचार होईल असे वाटले होते, मात्र यावेळीही निराशाच पदरी आली.  

आधी राज्यातील नेतृत्वाकडून आणि आता राष्ट्रीय पातळीवर देखील मुंडे भगिनींवर अन्याय केला जात असल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये निर्माण झाली. यातून मग राजीनामा सत्र, दिल्लीत पंतप्रधानांची भेट घेऊन आल्यावर नाराज समर्थकांचा घेतलेला मेळावा, यावेळी केलेल्या भाषणातून विरोधी पक्षनेते फडणवीस यांचा नामोल्लेख टाळत मी राष्ट्रीय पातळीवर काम करते, माझे नेते पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा हे असल्याचे सांगत केलेली टीका, यामुळे तुर्तास समर्थकांना शांत केल्याचे चित्र होते.

परंतु पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा आपली नाराजी प्रगट करण्याची संधी समर्थकांनी हेरली आहे. परळीसह बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे फलक लागले आहेत. मात्र समर्थकांनी यावर राज्य व केंद्र अशा दोन्ही नेत्यांना स्थान दिलेले नाही. केवळ स्व. गोपीनाथ मुंडे यांचे छायाचित्र या शुभेच्छा जाहीरातींवर सर्वत्र दिसत आहेत. वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन पंकजा मुंडे यांनी केल्यानंतरही त्यांच्या उत्साही कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी सुरू केली आहे. परंतु यातून आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Edited By : Jagdish Pansare

Related Stories

No stories found.