काही मंडळींकडून महाराष्ट्राला बदनाम करण्याचे कारस्थान : उध्दव ठाकरे

आतापर्यंत 28 हजार रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या राज्यात ॲक्‍टिव्ह केसेस 34 हजार आहेत. त्यापैकी 24 हजार रूग्णांना कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत. ते क्वारंटाईनमध्ये आहेत. तर मध्यम ते तीव्र लक्षणे असलेले साडे नऊ हजार रूग्ण आहेत. त्यामुळे राज्यात व मुंबईत परिस्थिती हाता बाहरे गेलेली नाही, असे श्री. ठाकरे यांनी स्पष्ट केले.
CM Uddhav Thackeray
CM Uddhav Thackeray

सातारा : महाराष्ट्रात कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या मोठी असून दिलासादायक आहे. आजपर्यंत २८ हजार रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या ३४ हजार असून यातील २४ हजार रूग्णांना कोणतीही लक्षणे नाही. केवळ १२०० रूग्ण गंभीर असून दोनजण व्हेंटीलेटरवर आहेत. त्यामुळे कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेली असून लष्कर बोलवा, सरकार काय काम करतयं, असे काही मंडळी म्हणत असून महाराष्ट्राला बदनाम करण्याचे कारस्थान करत आहेत, याचे मला दुःख होत आहे, अशी खंत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केली.
 
कोरोनाबाबतची महाराष्ट्रातील नेमकी परिस्थिती श्री. ठाकरे यांनी आज सोशल मिडियावरून महाराष्ट्रातील जनतेपुढे मांडली. ते म्हणाले, महाराष्ट्रात कोरोनाबाधित
रूग्ण बरे होण्याची संख्या मोठी व दिलासादायक असून महाराष्टात 65 हजार रूग्ण आहेत. पण जो रूग्ण सुरवातीला कोरोना बाधित होऊन आपल्या राज्यात आला आहे. तो रूग्ण बरा होऊन घरी गेला तरी त्याला कोरोनाबाधितच धरले जातेय. त्यामुळे आकडा मोठा दिसत आहे.

आतापर्यंत 28 हजार रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या राज्यात ॲक्‍टिव्ह केसेस 34 हजार आहेत. त्यापैकी 24 हजार रूग्णांना कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत. ते क्वारंटाईनमध्ये आहेत. तर मध्यम ते तीव्र लक्षणे असलेले साडे नऊ हजार रूग्ण आहेत. त्यामुळे राज्यात व मुंबईत परिस्थिती हाता बाहरे गेलीय, लष्कर बोलवा, असे म्हणणाऱ्यांना मला सांगायचे की केवळ 1200 रूग्ण गंभीर असून 200 जण व्हेंटीलेटरवर आहेत. त्यातूनही काहीजण सरकार काय काम करतंय का, असा प्रश्न उपस्थित करत आहेत.

कोरोनाच्या माध्यमातून काही मंडळी महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काररस्थान करत आहेत, त्याचेच मला दुख होत आहे.  ज्या पध्दतीने कोरोना रूग्ण संख्या वाढत आहेत. त्यामुळे आपण एका पातळीवर पोहोचलो आहोत. पण आपण सर्वांनी काही बंधने पाळली तर कोरोना बाधितांची संख्या कमी होईल. त्यामुळे आवश्‍यकता नाही त्यांनी घरातून बाहेर पडू नका. यामध्ये मधुमेह, रक्तदाब व इतर विकारातील लोकांनी तर अधिक काळजी घ्यावी. तसेच घराबाहेर पडणारा मध्यम वयोगटातील तसेच युवा वर्ग यांनीही आपल्याकडून इतरांना अनावधानाने संसर्ग होणार नाही, याची काळजी घ्या. 

रविवारपासून वृत्तपत्रे घरपोच देण्याची परवानगी

पुढील रविवारपासून (सात जून) वृत्तपत्रे घरपोच देण्याचा निर्णय आम्ही घेत आहोत. वृत्तपत्र विक्रेत्यांशी यासंदर्भात आम्ही बोलणार आहोत. कारण वृत्तपत्रे वाटप करणारी मुले आहेत. त्यांची काळजी घ्यावी लागेल. त्यांना मास्क व सॅनिटायझर द्यावे लागेल. वृत्तपत्र वितरण करण्याची परवागनी पुढील रविवारपासून आम्ही देत आहोत, असेही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी स्पष्ट केले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com