औरंगाबादकरांवर आभाळ कोसळले; तासाभरात ११६ मि.मी. पावसाने झोडपले..

औरंगाबादेतील आतापर्यंतच्या पावसाळ्यातील हा सर्वात मोठा पाऊस म्हणावा लागेल.
औरंगाबादकरांवर आभाळ कोसळले; तासाभरात ११६ मि.मी. पावसाने झोडपले..
Heavy Rain In Aurangabad News

औरंगाबाद : औरंगाबाद शहराला मंगळवारी सायंकाळी पावसाने जोरदार दणका दिला. आधी रिमझिम, मग मध्यम आणि त्यानंतर पावसाचा वेग इतका वाढला की काही मिनिटांतच पावसाने शंभर मिलीमिटरची पातळी ओलांडली. The sky fell on Aurangabadkars; 116 mm per hour. It rained ) अतिवृष्टी की ढगफुटी यावर चर्चा सुरू असली तरी तासाभराचे पावसाने औरंगाबादकरांची अक्षरशः दाणादाण उडवली.

रस्ते पाण्याखाली गेले, वाहने बुडाली, घरात पाणी शिरले, नदी, नाले ओसंडून वाहू लागले. ( Heavy Rain In Aurangabad) तर शहराच्या आसपासच्या भागात सगळीकडे पाणीच पाणी असे चित्र होते. औरंगाबादेतील आतापर्यंतच्या पावसाळ्यातील हा सर्वात मोठा पाऊस म्हणावा लागेल. सलग दीड ते दोन तास पडलेल्या पावसाने अनेक वसाहती जलमय झाल्या, हजारो घरांमध्ये पाणी शिरले.

सायंकाळी सात वाजून दहा मिनिटांनी सुरू झालेल्या मुसळधार पावसाने पुढील दोन तीन मिनीटात, रौद्र रूप धारण केले व सव्वाआठ पर्यंत एका तासात ढगफूटी पेक्षा जास्त वेगाने पाऊस झाला. सुरुवातीच्या अर्ध्या तासात पावसाचा सरासरी  वेग हा १६६.७५ मि.मी. इतका नोंदवला गेला. व नंतरच्या अर्ध्या तासात ५६.२ मि.मी. पावसाची नोंद झाली. काहीवेळाने पावसाचा वेग थोडा कमी होत गेला तेव्हा सरासरी ८६.९ , नंतर आणखी कमी होत ५३.२४ मि.मी. प्रति तास पावसाचा वेग राहिला.

तासाभरात शहरवासियांची दाणादाण..

एका तासात  ८७.६ मि.मी.इतक्या पावसाची शहरात पावसाची नोंद झाली. गेल्या तीन-चार दिवसांपासून शहरात पावसाची रिपरिप सुरु आहे. मंगळवारी सकाळपासून पाऊस सुरु होता. सायंकाळी सात वाजेच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. शहरातून वाहणाऱ्या नाल्यांना पूर आले, सखल भागात पाणी साचले.

समर्थनगर, औरंगपुरा, बुढीलेन, सिडको- हडको परिसरातील अनेक सेक्टर्स, जयभवानीनगर, गुलमंडी, मुकुंदवाडी, हर्सुल, पडेगाव, सातारा परिसर, गारखेडा, उल्कानगरी, आरेफ कॉलनी, जुनाबाजार, कटकट गेट, शरीफ कॉलनी, किराडपुरा, चंपाचौक, बायजीपुरा, सईदा कॉलनी, मुजफ्फरनगर, कुंभारवाडा, राजाबाजार, नारेगाव, मसनतपुर, चिकलठाणा, हिनानगर, भीमनगर- भावसिंगपुरा आदी भागातील वसाहतींमध्ये गुडघ्यापेक्षा जास्त पाणी साचले.

त्यामुळे हजारो घरांमध्ये पाणी शिरले, त्यातच वीज पुरवठाही खंडित झाल्यामुळे नागरिकांचे हाल झाले.तिलकपथकडे जाणाऱ्या गल्लीतील कपड्यांच्या दुकानातही पाणी शिरले. पैठणगेट, कटकटगेट, किराडपूरा, रहेमानिया कॉलनी, शरीफ कॉलनी येथील पूल ओसंडून वाहून वाहतूक खोळंबली होती.

झाड कोसळले, महामार्गही पाण्यात..  

हर्सूल, नारेगाव, मिसारवाडी, पडेगाव, टाऊनहॉल, नुरकॉलनी येथील काही घरात पाणी घुसले, सईदा कॉलनी, जटवाडा रोड येथील नागरिक पाण्यामुळे त्रस्त झाले. रस्त्यावर उभी वाहने पाण्यात अर्धी बुडाली. तर कैलास नगर येथील स्मशानी हनुमान मंदिरातही पाणी गेले होते. आहे या शिवाय अनेक भागात झाडे कोळसळी, महामार्गावर देखील गुडघाभर पाण्यातून वाहनांना मार्ग काढावा लागत होता.

Edited By : Jagdish Pansare
 

Related Stories

No stories found.