सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला शिवसेना प्रमुखांचे नाव द्या : शंभूराज देसाई

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प असा नामविस्तार करण्यासाठी मी यापूर्वीपासूनच आग्रही होतो.तशी मागणीही मी यापूर्वी केलेली होती. आजच्या सह्याद्री व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठानच्या बैठकीत त्याबाबत शिफारस करण्यात आली.
Minister shambhuraj desai
Minister shambhuraj desai

ढेबेवाडी (ता.पाटण) : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प असे नामविस्तार करण्यासाठी सह्याद्री व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठानच्या आजच्या बैठकीत शिफारस केली आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे. 

वनमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठानची व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे बैठक झाली.या बैठकीत संबंधित अधिकारी, सचिव, पदाधिकारी सहभागी झाले होते. साताऱ्यातून गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई ही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे सहभागी झाले होते. 

याबैठकीतील चर्चेविषयी माहिती देताना मंत्री देसाई म्हणाले, या बैठकीत मी सहभागी होऊन आपले म्हणणे मांडले. प्रकल्प व पर्यटन विकासाच्या दृष्टीने सुधारणा सुचवून काही मागण्याही केल्या. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प असा नामविस्तार करण्यासाठी मी यापूर्वीपासूनच आग्रही होतो.

तशी मागणीही मी यापूर्वी केलेली होती. आजच्या सह्याद्री व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठानच्या बैठकीत त्याबाबत शिफारस करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर याबाबत चर्चा करणार असून लवकरच हा प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर येऊन नामविस्तारावर शिक्कामोर्तब होईल, असा मला ठाम विश्वास आहे. सह्याद्री व्याघ्रच्या विकास आराखड्यावरही बैठकीत चर्चा होऊन मंजुरी देण्यात आली. 

यामध्ये तालुक्‍यातील काही ठिकाणे पर्यटनाच्या दृष्टीने नव्याने विकसित करण्याचे ठरले आहे. त्यासाठी सहा कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. घाटमाथ्यावर कोकण दर्शन विकसित करणे, वॉकिंग ट्रॅक तयार करणे आदी कामांचा त्यामध्ये समावेश असणार आहे. 

"सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या नाम विस्तारासाठी मी अनेक दिवसांपासून आग्रही होतो. लवकरच त्याबाबत अंतिम निर्णय होईल. या प्रकल्पास शिवसेना प्रमुखांचे नाव देणे ही महाराष्ट्रातील तमाम जनतेसाठी अभिमानाची बाब ठरणार आहे.'' 
- शंभूराज देसाई, गृहराज्यमंत्री 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com