नाभिक समाजावरील अन्यायाविरोधात शिवेंद्रसिंहराजे आक्रमक

काही दिवसांपुर्वी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भातील निर्बंध व नियमांचे पालन करण्याची अट घालून सलून दुकाने सुरु केली होती. मात्र, हा निर्णय अचानक बदलला आणि पुन्हा ही दुकाने बंद केली. यामुळे नाभिक समाजातील सलून चालक, मालक आणि कारागिरांचे जगणे मुश्किल झाले आहे.
MLA Shivendraraje Bhosale
MLA Shivendraraje Bhosale

सातारा : जिल्हा प्रशासनाने सलून दुकाने बंद ठेवणे हा नाभिक समाजावर अन्याय आहे. लोकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि सलून चालक, मालक व कारागिरांची उपासमार टाळण्यासाठी कोरोनासंबंधित नियम व निर्बंध घालून सलून दुकानेही पूर्ववत सुरु करावीत. याबाबत शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे.

आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी ई मेलद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमु्ख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविले आहे. निवेदनात त्यांनी म्हटले की, कोरोना महामारीमुळे देशाची अर्थव्यवस्था संकटात सापडली असताना लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात मॉल, रेस्टॉरंट, बार वगळता इतर सर्वप्रकारची दुकाने, व्यवसाय सुरु करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली होती.

त्यानुसार सातारा जिल्ह्यात इतर दुकानांसह सलूनची दुकानेही सुरु झाली. मात्र, पाचवा लॉकडाउन सुरु झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सलून दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. सलग दोन- तीन महिने दुकाने बंद होती आणि आता पुन्हा दुकाने बंद झाल्याने सलून चालक, मालक आणि कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे.

काही दिवसांपुर्वी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भातील निर्बंध व नियमांचे पालन करण्याची अट घालून सलून दुकाने सुरु केली होती. मात्र, हा निर्णय अचानक बदलला आणि पुन्हा ही दुकाने बंद केली. यामुळे नाभिक समाजातील सलून चालक, मालक आणि कारागिरांचे जगणे मुश्किल झाले आहे.मुख्यमंत्र्यांनी नुकताच मॉल आणि रेस्टॉरंट सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे सगळे व्यवसाय सुरु झाले पण, केवळ सलून दुकानेच बंद का, सलून दुकाने बंद ठेऊन काय साध्य होणार आहे, असा प्रश्‍न उपस्थित करून ते म्हणाले, लोकांनाही केस कापणे, दाढी करणे यासाठी सलून दुकाने सुरु असणे आवश्यक आहे. त्यामुळे सलून दुकाने बंद ठेवणे हा नाभिक समाजावर अन्याय आहे. लोकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि सलून चालक, मालक व कारागिरांची उपासमार टाळण्यासाठी कोरोनासंबंधीत नियम व निर्बंध घालून सलून दुकानेही पूर्ववत सुरु करावीत, अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com