उपराजधानीत शिवबंधन होतेय सैल, श्रेष्ठींनी पाठवला ‘हा’ निरोप...

सावरबांधे तडकाफडकी पक्ष सोडतील, असे कोणालाच वाटले नव्हते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्यापूर्वी त्यांनी इतरांसोबत सल्लामसलतसुद्धा केली नाही.
उपराजधानीत शिवबंधन होतेय सैल, श्रेष्ठींनी पाठवला ‘हा’ निरोप...
Shivbandhan

नागपूर : शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख शेखर सावरबांधे Shivsena's former District President Shekhar Sawarbandhe यांनी परवाच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर शिवसैनिकांत असलेला असंतोष उफाळून येत आहे. अनेकांनी सेना सोडण्याची तयारी चालवली असल्याची माहिती आहे. अशात शहरातील सेनेच्या माजी पदाधिकाऱ्यांना विचारणा झाली आहे. निरोप पाठवून त्यांना मुंबईला बोलावण्यात आले आहे. त्यामुळे येत्या काळात शिवसेनेत मोठा स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. The possiblity of big explosion in Shiv Sena can't be ruled out. 

शेखर सावरबांधे यांनी शिवबंधन तोडल्याने शिवसेनेमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. या घटनेची मुंबईतून दखल घेण्यात आली असून नागपूरमधील उफाळून आलेल्या असंतोषाचे कारण काय, अशी विचारणा माजी पदाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. सावरबांधे यांच्यापाठोपाठ अनेक पदाधिकारी सेना सोडण्याच्या तयारीत आहेत. यात एका नगरसेवकाचाही समावेश असल्याचे कळते. स्थानिक नेत्यांमुळे अनेक पदाधिकारी अस्वस्थ आहेत. मोठी पदे दिली तर त्यांना निर्णय घेण्याचे अधिकारसुद्धा देण्यात आले नाही. काहींना मुंबईतील पदाधिकाऱ्यांशी बोलण्यासही मनाई करण्यात आल्याचे समजते. शिवसेनेत प्रवेश करून फसलो, अशी भावना आता अनेक पदाधिकारी खासगीत व्यक्त करीत आहेत. त्यामुळे कुठल्याही क्षणी शिवसेनेत मोठा स्फोट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

नागपूरचे संपर्क प्रमुख आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांनी शहराची कार्यकारिणी जाहीर केली तेव्हापासूनच असंतोष उफाळून आला आहे. जिल्हाप्रमुख, संपर्क प्रमुख राहिलेल्या पदाधिकाऱ्यांचे डिमोशन केले होते. उलट कालपरवा काँग्रेसमधून आलेल्यांना डोक्यावर बसवल्याने नाराजी वाढली आहे. माजी जिल्हाप्रमुख सतीश हरडे यांनी त्याचवेळी नाराजी दर्शवून आपण दिलेली जबाबदारी पार पाडू शकत नाही, असे कळविले होते. सावरबांधे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. मात्र पदभारसुद्धा स्वीकारला नव्हता. आजही अनेक निष्ठावंत शिवसेनेत आहेत मात्र पक्षकार्यापासून अलिप्त आहेत. 

अनेकजण आपल्या स्तरावर काम करीत आहेत. सावरबांधे तडकाफडकी पक्ष सोडतील, असे कोणालाच वाटले नव्हते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्यापूर्वी त्यांनी इतरांसोबत सल्लामसलतसुद्धा केली नाही. आता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून नाराज पदाधिकारी बाहेर पडू शकतात, अशी भीती वर्तविली जात आहे. नाराजांना रोखण्यासाठी एका स्थानिक शिवसैनिकावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांनी आज सुमारे डझनभर सैनिकांना फोन केले. कुठलाही आततायी निर्णय घेऊ नका, अशी सूचना सर्वांना देण्यात आल्याचे समजते. 

सेना(एस) होणार नाही 
नागपूरमध्ये एक नेता शिवसेना(सी) असा स्थापन करण्यासाठी खटाटोप करीत आहे. त्याकरिता निष्ठावंतांना अडगळीत टाकल्या जात आहे. काँग्रेसमधील आयातांना पदावर नेमण्यात आले आहे. मात्र त्यांचेही अधिकार गोठवून ठेवले आहेत. सध्याच्या कार्यकारिणीवर चारदोन पदाधिकारी सोडले तर कोणीच समाधानी नाही. याच्या सर्व तक्रारी मुंबईत पोहोचल्या आहेत. शिवसैनिकांना नक्कीच न्याय मिळेल. आता जास्त दिवस वाट बघावी लागणार नाही, असे एका पदाधिकाऱ्याने बोलताना सांगितले.
Edited By : Atul Mehere

Related Stories

No stories found.