घाटात अडकलेल्या प्रवाशांना शिवसेना आमदाराने दिले शिवभोजन..
Shivsena Mla Udaysing Rajuput News Aurangabad

घाटात अडकलेल्या प्रवाशांना शिवसेना आमदाराने दिले शिवभोजन..

दोन्ही बाजूंनी वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्यामुळे ते चालतच घाटात झालेल्या नुकसान आणि अडथळ्याची पाहणी करण्यासाठी गेले.

औरंगाबाद ः जिल्ह्याच्या काही भागात झालेल्या मुसळधार पावसाने कन्नड-चाळीसगांव घाट दरड कोसळल्याने काल रात्रीपासून बंद आहे. घाटाच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या लांब रांगा लागल्याने प्रवासी आणि नागरिक अडकून पडले होते. (Shiv Sena MLA gives Shiv Bhojan to passengers stranded in Ghats)  त्यांच्या मदतीला शिवसेनेचे आमदार उदयसिंह राजपूत धावून गेले. रात्रभर पावसात अडकलेल्या प्रवाशांना त्यांनी शिवभोजन थाळी पोहचवत दिलासा दिला.

कन्नड तालुक्यातील ९ पैकी ७ सर्कलमध्ये अतिवृष्टी झाली असून एक पाझर तलाव आणि छोटे धरण फुटल्याची माहिती राजपूत यांनी सरकारनामाशी बोलतांना दिली.(Shivsena Mla Udaysingh Rajput Kannad) राज्याच्या अनेक भागात कालपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. कन्नड-चाळीसगांव परिसरात रात्रीपासून जोरदार पावसामुळे घाटात अनेक ठिकाणी दरड कोसळून मार्ग बंद झाला. दोन्ही बाजूंनी शेकडो वाहने अडकून पडली होती.

हे समजताच कन्नड-सोयगावचे शिवसेना आमदार उदयसिंह राजपूत यांनी घटनास्थळी धाव घेत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना देखील तिथे येण्याची विनंती केली. (District Collector Sunil Chavan Visit) काही तासातच हे दोघेही कन्नड-चाळीसगाव घाटात पोहचले. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्यामुळे ते चालतच घाटात झालेल्या नुकसान आणि अडथळ्याची पाहणी करण्यासाठी गेले. रात्रीपासून अडकलेल्या प्रवाशांची विचापूस करतांनाच घाटात ज्या ज्या ठिकाणी अडथळा निर्माण झाला तो दूर करण्यासाठी यंत्रणा पाचारण करण्यात आली.

रात्रीपासून सुरू असलेले काम अद्यापही सुरूच आहे. दरम्यान घाटात अडकलेले वाहनचालक, प्रवासी व सर्वसामान्य नागरिकांची उपासमार होऊ नये यासाठी आमदार राजपूत यांनी त्यांना शिवभोजन थाळी देण्याची व्यवस्था केली होती. कन्नड घाटात मदतकार्याला वेग आल्यानंतर राजपूत यांनी अतिवृष्टीमुळे शेतजमीन खरडून निघालेल्या शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या नुकसानीची पाहणी केली.

उपविभागीय अधिकारी, कृषी अधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी, गटविकास अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी पाहणी केली व संबंधितांना सूचना केल्या. झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडून शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणार असल्याची ग्वाही देखील आमदार राजपूत यांनी दिली आहे.

Edited By : Jagdish Pansare

Related Stories

No stories found.