Shiv Sena leaders protested against Arnab Goswami | Sarkarnama

अर्णब गोस्वामींचा शिवसेनेच्या 'या' नेत्यांनी केला निषेध 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 10 ऑगस्ट 2020

अर्णब गोस्वामी हे गर्विष्ठ व अहंकारी आहेत. ते फार बुद्धीमान, हुशार आहेत, असं समाजाला वाटतं होतं, पण त्याच्या अंहकारीपणामुळे त्याचं महत्व आता कमी होत चालले आहे.  

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करणारे रिपब्लिक भारत वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांचा शिवसेनेच्या उपनेत्या व प्रवक्ता नीलम गोरे यांनी निषेध केला आहे. याबाबत नीलम गोरे यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्यांनी अर्वब गोस्वामी यांच्यावर टिका केली आहे. 

नीलम गोरे या व्हिडिओमध्ये म्हणतात की गोस्वामी हे स्वतःला भारताचे सुप्रीम कोर्ट व मुख्य न्यायाधीश समजतात. प्रसारमाध्यमात आपल्याला काहीही करण्याचा अधिकार असल्याप्रमाणे ते वागतात. मी भारताची नागरिक, शिवसेनेची  प्रवक्ता व शिवसैनिक म्हणून अर्णब गोस्वामी यांचा निषेध करते, असे शिवसेनेच्या उपनेत्या व प्रवक्ता नीलम गोरे यांनी म्हटले आहे. अर्णब गोस्वामी हे गर्विष्ठ व अहंकारी आहेत. ते फार बुद्धीमान, हुशार आहेत, असं समाजाला वाटतं होतं, पण त्याच्या अंहकारीपणामुळे त्याचं महत्व आता कमी होत चालले आहे.  

 
हेही वाचा  : हिंमत असेल... तर भाजपने आदित्य ठाकरे यांचं नाव घ्यावं...
 
मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात "हिंमत असेल... तर भाजपने आदित्य ठाकरे यांचं नाव घ्यावं," असे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. सुशांतसिंह राजपूत याचा
आत्महत्येचं राजकारण काही जण करीत असल्याचे राऊत यांनी सांगितलं. सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास करणं हे राज्य सरकार आणि मुंबई पोलिस यांचं कर्तव्य आहे. ते तपास करीत आहेत. सुशांतसिंह हा मुंबईतील मुलगा होता.
पण बिहारमध्ये निवडणूक असल्यामुळे त्यांच्या आत्महत्येचं राजकारण करणं चुकीचं आहे, असे राऊत यांनी सांगितलं. या प्रकरणात राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच नाव भाजपचे नेते घेत आहेत, या प्रश्नाचं उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, "आदि्त्य ठाकरे यांचं काम उत्तम आहे. ते कोरोना रूग्णांनाही मदत करीत आहे. सुशांतसिह राजपूत प्रकरणात त्यांचं नावं घेऊन त्यांना बदनाम करण्याचं काम काही जण करीत आहेत. हिंमत असेल तर भाजपने आदित्य ठाकरे यांच्याबाबत पुरावे सादर करावे. विनाकारण त्यांची बदनामी केल्यानं राज्याचं नुकसान होत आहे."   

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख