माण बाजार समिती बिनविरोध करण्यासाठी शेखर गोरेंची हाक..!
Shekhar Gore's call to make Maan Bazar Samiti unopposed ..!

माण बाजार समिती बिनविरोध करण्यासाठी शेखर गोरेंची हाक..!

आर्थिक अडचणीत सापडलेल्या बाजार समितीला बाहेर काढण्यासाठी निवडणूक बिनविरोध करून आसपासच्या बाजार समित्यांप्रमाणे माणची बाजार समिती आयडीयल बनवू यात.

बिजवडी : माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती आर्थिक अडचणीत असून ती मोडकळीस आली आहे. या समितीला उभारी देण्यासाठी ही निवडणूक बिनविरोध करणे गरजेचे आहे. बिनविरोधसाठी आपण शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्नशील असून सर्वांनी कमीजास्त जागा घेऊन निवडणूक बिनविरोध करूया, असे आवाहन शिवसेनेचे युवा नेते शेखर गोरे यांनी केले आहे. Shekhar Gore's call to make Maan Bazar Samiti unopposed ..!

माण तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असून काही गावे रेड झोनमध्ये आहेत. असे असतानाही बाजार समितीची निवडणूक लादण्यात आली आहे. वास्तविक बाजार समिती आर्थिक अडचणीत आहे. माणच्या बाजार समितीकडे आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे कोणतेच साधन नाही. आजपर्यंत सर्वांनीच फक्त सत्तेची चव चाखली आहे.

मात्र बाजार समिती सुस्थितीत आणण्यासाठी कोणीच प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे या समितीची निवडणूक लावून तिला आणखी आर्थिक खाईत लोटण्यापेक्षा समितीच्या हितासाठी निवडणूक बिनविरोध होणे गरजेचे आहे. सर्वच पक्षांनी अर्ज भरले असले तरी अजूनही वेळ गेलेली नाही. सर्वांनी याचा विचार करणे गरजेचे आहे. आजपर्यंत कोणत्याच सत्ताधाऱ्यांनी बाजार समितीच्या हिताचे निर्णय घेतले नसल्याने बारामती, फलटण, कराड, कोरेगाव, लोणंदसारखी आपली बाजार समिती बनली नाही. 

आर्थिक अडचणीत सापडलेल्या बाजार समितीला बाहेर काढण्यासाठी निवडणूक बिनविरोध करून आसपासच्या बाजार समित्यांप्रमाणे माणची बाजार समिती आयडीयल बनवू यात. यासाठी सर्वांनी शेतकऱ्यांच्या व समितीच्या हितासाठी सर्वांनी एकत्र येत जागांवर एकमत करून बिनविरोधसाठी निर्णय घेऊया, असे आवाहनही शेखर गोरे यांनी केले आहे.

निवडणूक निधीसाठीही पैसे नाहीत..

दीड वर्षापासून कोरोना व लॉकडाऊनमुळे सर्व यंत्रणा बंद आहेत. त्यामुळे बाजार समितीला मिळणारे थोडेफार उत्पन्नही बंद झालेय. कर्मचाऱ्यांचे पगार थकलेत. अशा आर्थिक अडचणीत असतानाही या निवडणूकीसाठी पाच ते सहा लाख रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. तो निधी भरण्यासाठीही समितीकडे पैसे नाहीत. कर्मचाऱ्यांचे पगार थकवून व इतर जमा पैशांतून थोडाफार निधी भरण्यात आला आहे. उर्वरित निधी भरण्यासाठी समितीची दमछाक होतेय.
 

Related Stories

No stories found.