शशी थरूर म्हणाले, "सरकारला प्रश्न विचारणं आता दुर्मिळ झालं.." - Shashi Tharoor said It is now rare to ask questions to the government | Politics Marathi News - Sarkarnama

शशी थरूर म्हणाले, "सरकारला प्रश्न विचारणं आता दुर्मिळ झालं.."

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 2 सप्टेंबर 2020

हे सरकार फक्त संसदेला फक्त सूचना देत आहे. आपल्या बहुमताचा व सत्तेचा वापर एका रबरी शिक्क्याप्रमाणे करीत आहेत.

नवी दिल्ली : संसदेच्या येत्या पावसाळी अधिवेशनात प्रश्नसत्र होणार नसल्याने काही खासदारांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. काँग्रेसचे खासदार व माजी केंद्रीयमंत्री शशी थरूर यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. शशी थरूर म्हणाले, "चार महिन्यापूर्वी मी म्हटलं होतं की कोरोनाचे कारण देऊन काही ताकदवान नेता लोकशाही संपविण्याचा प्रयत्न करीत आहेत."

शशी थरूर यांनी याबाबत टि्वट करून मोदी सरकारवर निशाना साधला आहे. आपल्या टि्वटमध्ये शशी थरूर म्हणतात की सरकारला प्रश्न विचारणं आता दुर्मिळ झालं आहे. हे सरकार फक्त संसदेला फक्त सूचना देत आहे. आपल्या बहुमताचा व सत्तेचा वापर एका रबरी शिक्क्याप्रमाणे करीत आहेत. आपल्या मनाप्रमाणे हे सरकार संसदेत अनेक विषयाना मंजूरी घेत आहेत. या सरकारला आता दूर केलं पाहिजं.

संसदेचे पावसाळी अधिवेशन ता. 14 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यसभा आणि लोकसभेच्या कामकाजात काही बदल करण्यात आले आहे. यंदा अधिवेशनात प्रश्नसत्र होणार नसल्याचे संसदेच्या प्रशासकीय यंत्रणेने सांगितलं आहे. ता. 1 ऑक्टोबरपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. अधिवेशनात उपस्थित राहण्यापूर्वी खासदारांची कोरोना चाचणी होणार आहे. खासदारांना सभागृहात मास्क लावून बसणे अनिवार्य आहे. तसेच भाषण करताना मास्क लावणे गरजेचे आहे. 

ता. 14 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता लोकसभेची बैठक सुरू होणार आहे. अन्य दिवशी दुपारी तीन ते सांयकाळी सात वाजेपर्यंत ही बैठक असणार आहे. याचप्रमाणे राज्यसभेची बैठक पहिल्या दिवशी (ता. 14 सप्टेंबर) दुपारी तीन सांयकाळी सातपर्यंत असेल. तर अन्य दिवशी सकाळी नऊ ते दुपारी 1 वाजेपर्यंत ही बैठक असेल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर राखून ही बैठक होणार आहे. यासाठी बैठक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे, यासाठी सर्व दालन आणि गॅलरीमध्येही बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. 

हेही वाचा : तर गुलाम नबी आझाद आणि सिब्बलांचे भाजपमध्ये स्वागत करु : रामदास आठवले
नवी दिल्ली : गुलाम नबी आझाद आणि कपील सिब्बल यांनी काँग्रेसच्या उभारणीत मोठे योगदान दिले आहे. जर राहुल गांधी त्यांच्यावर आरोप करत असतील तर या दोन्ही नेत्यांनी काँग्रेस सोडावी, आम्ही भाजपमध्ये त्यांचे स्वागत करु, असे प्रतिपादन केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री व रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले आहे. पुढील निवडणुकीत पुन्हा एकदा एनडीएचीच सत्ता येणार आहे. जर कपिल सिब्बल आणि गुलाम नबी आझाद यांच्या सारख्या ज्येष्ठ नेत्यांवर भाजपशी हातमिळवणी करण्याचे आरोप काँग्रेसमधून होत असतील तर या दोन्ही नेत्यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या प्रमाणे पक्षाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करणे योग्य ठरेल, असे आठवले म्हणाले.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख