सतरा दिवसानंतर कन्नड-औट्रम घाट वाहतुकीसाठी खुला, पण..

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ताडीने आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने मदत कार्य सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
सतरा दिवसानंतर कन्नड-औट्रम घाट वाहतुकीसाठी खुला, पण..
Kannad-Autram Ghat Open for traffice- Mla Udaysingh Rajput Aurangabad News

औरंगाबाद ः कन्नड तालुक्यात ३० औगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टी व दरड कोसळल्यामुळे कन्नड-चाळीसगावकडे जाणार औट्रम घाट वाहतुकीसाठी बंद होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची सूचना आणि राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी यांच्या प्रयत्नातून  आजपासून सुरू झाला आहे. (Seventeen days later Kannada-Autram Ghat open for traffic)

घाटातील एक बाजू दुरुस्त करण्यात आली असून दुसऱ्या बाजूचे काम अजूनही शिल्लक आहे. त्यामुळे सध्या दुचाकी आणि कार या चारचाकी वाहनांसाठी हा घाट खुला करण्यात आला आहे. (Shivsena Mla Udaysingh Rajput Kannad, Aurangabad) येत्या पंधरा वीस दिवसांत अवजड वाहनांसाठी देखील घाट खुला करण्यात येईल, अशी माहिती शिवसेनेचे आमदार उदयसिंह राजपूत यांनी दिली आहे.

औट्रम घाट वाहतुकीसाठी खुला झाला आहे, याची माहिती व्हावी, यासाठी याचे औपचारिक उद्घाटन देखील रापजूप यांच्या हस्ते व बांधकाम विभागाच्या अधिकारी व ग्रामस्थांच्या उपस्थित करण्यात आले. ( Kannada-Autram Ghat open for traffic) त्यानंतर औट्रम घाटाच्या दोन्ही बाजूंसाठी घाट खुला करण्यात आला. ३० आॅगस्ट रोजी कन्नड तालुक्यात अतिवृष्टी झाली होती.

यामुळे औट्रम घाटात तीन ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या. यात काही ट्रक दरीत कोसळून जनावरे आणि चालकांचा दुर्दैवी मृत्यू देखील झाला होता. पावसाचा जोर भंयकर असल्यामुळे घाटात मोठ्या प्रमाणात मलबा साचला होता. पाचेशहून अधिक वाहने दोन्ही बाजूंनी अडकली होती. पाऊस देखील पुर्णपणे बंद नसल्यामुळे मदत कार्य आणि घाटातील मलबा हटवण्याच्या कामात मोठ्या अडचणी येत होत्या.

औरंगाबाद कन्नडमधून औट्र्म घाट मार्गे धुळे, चाळीसगांवकडे जाणाऱ्या वाहनांना पर्यांयी परंतु लांबचा मार्ग स्वीकारावा लागत होता. त्यामुळे वाहनधारकांचा वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होत होता. दरड कोसळल्याची घटना समजताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ताडीने आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने मदत कार्य सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

अवजड वाहतूकही लवकरच सुरू करू..

मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी देखील शासन आणि राष्ट्रीय महामार्ग, बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सातत्याने संपर्कात होतो. घाट वाहतुकीसाठी लवकरात लवकर सुरू होऊन नागरिकांची गैरसोय टळवी, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. अखेर सगळ्यांच्या प्रयत्नांना यश आले.

आज सतरा दिवसानंतर दुपारी साडेतीन वाजेपासून औट्रम घाट दुचाकी, चारचाकी कार या छोट्या वाहनांसाठी खुला करण्यात आल्याचेही आमदार राजपूत यांनी सांगितले. सर्वसामान्य जनतेने आता आपली वाहने लांबून, वळसा घालून न नेता औट्रम घाटातून न्यावी, असे आवाहन देखील राजपूत यांनी केले आहे.

Edited By :Jagdish Pansare

Related Stories

No stories found.