एसटी संपावर वेतनवाढीचा तोडगा?

समितीच्या पुढे राज्य सरकार (State Government) सुद्धा आपली बाजू मांडणार आहे.
एसटी संपावर वेतनवाढीचा तोडगा?
anil parab, sharad pawarsarkarnama

मुंबई : गेल्या काही दिवसापासून राज्यातील एसटी कर्मचारी (S.T Workers) एसटीचे राज्य शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी काम बंद आंदोलन करत आहेत. या आंदोलनाची कोंडी अद्यापही कायम असल्याने त्यावर तोडगा काढण्यासाठी कर्मचाऱ्यांची वेतनवाढ करण्याबाबत सोमवारी (ता. 22 नोव्हेंबर) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, (Sharad Pawar) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यात सुमारे साडेचार तास बैठक झाली. त्या पार्श्वभूमीवर 2020-24 हा वेतनवाढ कराराचा निर्णय होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

anil parab, sharad pawar
भाजपच्या राज्यात आता मोहाची दारू पिऊन 'झिंग झिंग झिंगाट'! मुख्यमंत्र्यांची घोषणा

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विद्यार्थ्यांचे तसेच, सर्वसामान्य प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी ही बैठक बोलावली होती. बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह एसटीतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी एसटीचा संप मिटवण्याच्या दृष्टीने चर्चा झाली. एसटीची सध्याची आर्थिक परिस्थिती, भविष्यात एसटी कशी रुळावर येईल, त्यावरील उपाययोजना आणि संपकऱ्यांच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

anil parab, sharad pawar
पवारांनी दोन वर्षांपूर्वी उद्धव ठाकरेंचा हात स्वतः वर केला... त्यानंतर इतिहास घडला!

दरम्यान, एसटीच्या संपावर तोडगा काढण्यासाठी वेतनवाढीच्या मुद्द्यावर यावेळी चर्चा करण्यात आली आहे. शिवाय इतर राज्यांतील वेतन आणि महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा तुलनात्मक आढावा घेण्यात आला. मात्र, या चर्चेवर अद्याप कोणताही ठोस निर्णय झाला नाही. उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीपुढे एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन वाढेल, अशा सकारात्मक पद्धतीनेच बाजू मांडणार असल्याचे परबांनी सांगितले. तसेच, राज्य सरकार किंवा संपकऱ्यांनी संप ताणून चालणार नाही. यामध्ये नुकसान कर्मचाऱ्यांचेच आहे. न्यायालयाने विलीनीकरणाच्या मागणीसाठी समिती स्थापन केली आहे. समितीच्या पुढे राज्य सरकार सुद्धा आपली बाजू मांडणार आहे. त्यानंतर समितीचा जो अहवाल येईल तो मान्य राहील असे परब यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.