शाळा सुरू होणार! आरोग्यमंत्री टोपेंनीच सांगितली तारीख

आगामी काळात टास्क फोर्स आणि केंद्र सरकारच्या (Central Government) सुचनाचे पालन केले जाईल, असे राजेश टोपे (Rajesh Tope) म्हणाले.
School
School Sarkarnama

जालना : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधितांची (Covid-19) संख्या कमी होत असल्याने पुन्हा एकदा शाळा (School Open) उघडण्याचा निर्णय राज्य सरकारकडून (State Government) घेण्यात येण्याची शक्यता आहे. कोरोनाचा संभाव्य धोका पहाता शाळा सुरू करायची की नाही याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार हे जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्यामुळे काही जिल्ह्यात शाळा सुरू झाल्या असून काही जिल्ह्यात अद्यापही शाळा सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र, मागील काही दिवसांमध्ये कोरोना रुग्ण कमी झाल्याने शाळा उघडण्यात आल्या आहेत. तर, काही ठिकाणी अजूनही शाळा बंदच आहेत. याबाबत आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी (Rajesh Tope) सुचक वक्तव्य करत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन पहिली ते पाचवी पर्यंतचे वर्ग 1 फेब्रुवारी पासून सुरु करण्याचा राज्य सरकारचा मानस असल्याचे म्हटले आहे. ते जालन्यात बोलत होते.

School
'नाराज कार्यकर्त्यांना कसे खुश करायचे हे मला चांगल्याप्रकारे माहिती आहे'

टोपे म्हणाले, ब्रिटन आणि फ्रांसच्या प्रधानमंत्र्यानी आता आपल्याला कोरोना बरोबर राहायचे आहे, असे म्हटले आहे. त्यामूळे या राष्ट्रापासून बोध घेऊन आगामी काळात टास्क फोर्स आणि केंद्र सरकारच्या सुचनाचे पालन केले जाईल, असे टोपे म्हणाले.

School
आंदोलनकर्त्या महिली कामगारांची समजूत काढण्यासाठी आमदार झाडावर चढले

राज्य, समाज आणि स्वतःच्या सुरक्षीततेसाठी नागरीकांनी दुसऱ्या डोसचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन देखील टोपेंनी केले आहे. कोरोनामुळे राज्याच्या तिजोरीवर आर्थिक ताण आल्याची कबुलीही टोपेंनी यावेळी दिली आहे. कोरोनामुळे निर्बंध लावण्यात आल्याने उद्योजकांना नुकसान होतय. मात्र, महसूल देखील कमी प्रमाणात जमा होत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. नागरीकांनी कोरोना लसीकरण करत कोरोना नियमांचे पालन केल्यास आपण लवकर कोरोनावर मात करू असा, विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com