मराठवाड्याच्या हक्काचं पाणी मतदारसंघात आणणार - तानाजी सावंत

मराठवाड्याच्या हक्काचं पाणी मतदारसंघात आणणार - तानाजी सावंत

परंडा : परंडा विधानसभा मतदारसंघात अनेक विधायक कामे केली. आता मराठवाड्याचे हक्काचे पाणी मतदारसंघात खेळविणार असल्याचा विश्वास परंडा विधानसभा मतदार मतदारसंघातील शिवसेना- भाजप महायुतीचे उमेदवार डॉ. तानाजी सावंत यांनी व्यक्त केला. "करून दाखवलं, करीत राहणार ', ही भूमिका असल्याचे आमदार डॉ. सावंत गावभेट संवाद दौऱ्याच्या माध्यमातून सांगत आहेत. परंडा तालुक्‍यातील कोकरवाडी, तांदुळवाडी, काटेवाडी, जगदळवाडी यासह अनेक गावांना शनिवारी त्यांनी भेटी दिल्या. 

शेतकरी शेतमजूर, तरुण, छोटे व्यावसायिक बचतगटांतील महिलांशी संवाद साधताना मराठवाड्याचे हक्काचे पाणी या भागाला उपलब्ध झाल्यास या भागाची दुष्काळी मतदारसंघ ही ओळख पुसली जाणार आहे. मागील काही दिवसांपासून बाळासाहेब ठाकरे शिवजलक्रांतीच्या माध्यमातून नदी, नाले, ओढे, याचे खोलीकरण, रूंदीकरण व सरळीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. शिक्षण, सर्वसामान्याच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी प्राधान्याने काम करणार आणि मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलणार असल्याचे सावंत सांगत आहते. शेती हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे, शेतकऱ्याच्या कर्जमुक्तीचा विषय महत्वाचा आहे. शेतकऱ्यांना वेळत पिककर्ज दिले जावे, यासाठी अनेक बॅंकांना भेटी दिल्या आहेत. जनता दरबाराच्या माध्यमातून अनेकांचे प्रश्न मार्गी लागल्याचे ते म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com