सातारा जिल्हा बँकेने मोडला नफ्याचा विक्रम, १३३.९५ कोटी नफा

आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाशी सातारा जिल्हा बँकेने एमओयु करार केला असून, मराठा बेरोजगार तरूणांना व्यवसायाकरीता कर्जपुरवठा चालू केला आहे. याअंतर्गत 168 बेरोजगार तरुणांना 14 कोटी 56 लाखांचे कर्ज वितरण केले आहे.
Satara District Cooperative Bank breaks 70-year profit record
Satara District Cooperative Bank breaks 70-year profit record

सातारा  : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेस 2019-20 या आर्थिक वर्षात 133.95 कोटी इतका करपूर्व तर करोत्तर 109.98 कोटींचा नफा झाला आहे. गेल्या 70 वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदा इतका विक्रमी नफा झाला आहे, अशी माहिती बॅंकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली आहे. दरम्यान, यावर्षात बँकेने 720 सोसायट्या नफ्यात आणल्या असून यावर्षी सभासदांना 12 टक्के लाभांश देण्याची तरतूद केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 


जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये केलेले कामकाज आणि भविष्यकालिन उपाय योजनाबाबतची माहिती बॅंकेचे अध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, जिल्हा बॅंकेने मार्च 2020 अखेर ठेवीचा सात हजार 500 कोटींचा टप्पा ओलांडला असून बॅंकेकडे सात हजार 622 कोटी 28 लाख 60 हजार इतक्‍या ठेवी झाल्या आहेत. बॅंकेचा संमिश्र व्यवसाय मार्च 2020 अखेर 12 हजार 867 कोटी 45 लाख इतका आहे. 

या आर्थिक वर्षात बॅंकेस 133.95 कोटी इतका करपूर्व तर 109 कोटी 98 लाख इतका विक्रमी करोत्तर नफा  झाला आहे. गेल्या 70 वर्षात प्रथम इतका विक्रमी नफा झाल्याचे त्यांनी नमुद केले. ते म्हणाले, या आर्थिक वर्षात मार्चअखेर ढोबळ एनपीएचे प्रमाण 0.23 टक्के इतके तर निव्वळ एन पी ए शून्य' टक्के ठेवण्यात बॅंकेला यश आले असून गेली 12 वर्षे शून्य' टक्के एन.पी.ए. राखण्यात यश मिळविले आहे.

या उल्लेखनिय कामाबद्दल आरबीआय व नाबार्ड यांनी विशेष प्रकारे सन्मानित केले आहे 2007-08 पासून बॅंकेचे निव्वळ एन .पी .ए . चे प्रमाणे शून्य टक्के राखले आहे. वसुल भाग भांडवलात विक्रमी वाढ झाली असून गेल्यावेळच्या भाग भांडवलात 27 कोटींनी वाढ होऊन यावर्षी भागभांडवल 224 कोटी झाले आहे. बॅंकेच्या निधीमध्ये भरीव वाढ झाली असून, गतसालच्या तुलनेत निधीत 31 कोटींनी वाढ झाली आहे, असेही त्यांनी नमुद केले आहे. 

बॅंकेने गुंतवणूकीकरीता स्वतंत्र विभागाची स्थापना केली असून सरकारी कर्जरोख्यांच्या ट्रेडींगमधून या आर्थिक  वर्षात सात कोटी 11 लाखांचे उत्पन्न मिळविले आहे, असे सांगून शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, यावर्षी जिल्ह्यातील 953 विकास सेवा सोसायट्यांपैकी 720 विकास संस्था नफ्यात आणणेत यश आले आहे. मागील 10 वर्षाहून अधिक काळ 10 टक्केहून अधिक लाभांश  दिला असून गेल्यावर्षी 12 टक्के प्रमाणे 16 कोटी 22 लाख तरतूद केली होती. या आर्थिक वर्षात बॅंकेच्या सभासदांना 12 टक्के लाभांशाची तरतूद केली असून त्यासाठी 23 कोटी 96 लाख रूपयांची तरतूद केली आहे. शेतकरी सभासदांना तीन लाखांपर्यंतचे पीककर्ज शून्य टक्के व्याजदराने वितरीत करीत असून या वर्षासाठी पाच कोटी 75 लाखांची तरतूद केली आहे. 

शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी घेतलेले कर्ज शून्य' टक्के व्याजदराने वितरीत केले असून या वर्षाकरिता एक कोटी 25  लाख रक्कमेची तरतूद केली आहे . विकास संस्थांनी गोडावून व इमारत बांधकामासाठी घेतलेले कर्ज शून्य' टक्के दराने उपलब्ध केले आहे. त्यासाठी 45 लाख रक्कमेची तरतूद केली आहे. चांगले काम करणाऱ्या विकास सेवा सोसायट्यांच्या सचिवांना 8.33 टक्के प्रमाणे बक्षिस पगाराची तरतूद नफ्यातून केली आहे. तसेच बॅंक अधिकारी व सेवक यांना 8.33 टक्के सानुग्रह अनुदान व 4.17  टक्के बक्षिस पगाराची तरतूद केली आहे. प्रधानमंत्री किसान योजने अंतर्गत बॅंकेच्या दोन लाख 90 हजार 351 शेतकरी खातेदारांच्या खात्यावर 146 कोटी 29 लाख 60 हजार इतकी आर्थिक मदत जमा झाली आहे. 

बॅंकेच्या 19 लाखांहून अधिक खातेदारांच्या पाच लाखपर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण देण्यात आले आहे. यावर्षी तीन लाख सेव्हिंग ठेव खाती जोण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजनेअंतर्गत  24781 सभासदांनी विमा घेतला असून, प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजनेअंतर्गत एक लाख 10 हजार 736 सभासदांनी विमा घेतला आहे.

बॅंकेचे महत्वाचे निर्णय..... 

मोबाईल बॅंकिंग व्हॅनची खरेदी 
ग्राहकांच्या सोईसाठी 47 एटीएम कार्यान्वित 
650 मायक्रो एटीएमतून दुर्गम ग्राहकांना घरपोच बॅंकिंग 
आणखी 100 एटीएम कार्यान्वित करणार 
7/12 व खाते उतारा बॅंकेच्या शाखेत मिळणार 
कोरोना निवारणासाठी दोन कोटी 16 लाखांची मदत 
यशवंत किसान मंच'च्या माध्यमातून 45 शेतकरी गट स्थापन 
आत्महत्याग्रस्त पाच शेतकऱ्यांच्या वारसांना चार लाख 61 हजार 645 मदत 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com