कोरोना बॉम्ब : साताऱ्यात ४० रूग्ण वाढले, पुन्हा निर्बंध वाढणार - Satara District Another 40 Corona Infected Patients Found Today | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोना बॉम्ब : साताऱ्यात ४० रूग्ण वाढले, पुन्हा निर्बंध वाढणार

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 23 मे 2020

सातारा जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 241 झाली असून यापैकी १२१ रूग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत ११४ रूग्ण कोरोनामुक्त होवून घरी गेले आहेत. मृत्यु झालेले 6 रुग्ण आहेत.

सातारा :  सातारा जिल्ह्यात शुक्रवारी एक ही कोरोनाबाधीत न सापडल्याने समाधानाचे गुड फ्राय डे वातावरण होते. मात्र, आज (शनिवारी) सकाळी जिल्ह्याला मोठा धक्का बसला. तब्बल ४० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य विभाग खडबडून जागा झाला. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या २४१ वर पोचली  आहे.
रुग्ण संख्या वाढू लागल्यामुळे सातारा जिल्हा पुन्हा निर्बंधाच्या कचाट्यात जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

यामध्ये लोधवडे ( ता. माण ) येथील एक रूग्ण मृत्यू पश्चात पॉझिटिव्ह आला आहे. तर एकजण पूर्वीचा पॉझिटिव्ह असून दहा दिवसाच्या तपासणी नंतरही तो पुन्हा पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात 40 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

आज आढळलेल्या रुग्णांमध्ये तालुकानिहाय वर्गीकरण केल्यास पाटण तालुक्यात १८, खंडाळा चार, कऱ्हाड तीन, फलटण चार, माण तीन, कोरेगाव दोन, सातारा पाच, वाई एक रूग्णांचा समावेश आहे. यामध्ये मुंबई येथून आलेला कराड तालुक्यातील बाचोली येथील 47 वर्षीय पुरुष, जळगाव येथून आलेला उंब्रज येथील 58 वर्षीय पुरुष, मुंबई येथून आलेला गवेवाडी (ता. पाटण) येथील 27 वर्षीय पुरुष व 20 वर्षीय युवक.

 मुंबई येथून प्रवास करुन आलेला बहुलेकरवाडी (ता. पाटण) येथील 60 वर्षीय पुरुष, मुंबई येथून आलेली कोरेगाव येथील 40 वर्षीय महिला, शिरताव (ता. माण) येथील 25 वर्षीय पुरुष, लोधवडे ता. माण येथील 67 वर्षीय पुरुष (मृत), शिरताव ता. माण येथील 28 वर्षीय पुरुष, कोळकी (ता. फलटण) येथील 34 व 60वर्षीय महिला, 9 वर्षाचे दोन बालके.

 जकातवाडी (ता. सातारा) येथील 27 वर्षीय पुरुष, शाहुपूरी (ता. सातारा) येथील 29 वर्षीय पुरुष व 52 वर्षीय महिला, धनवडेवाडी (ता. सातारा) येथील निकट सहावासित 36 वर्षीय पुरुष व 22 वर्षीय महिला, घारदरे (ता. खंडाळा) येथील 51 वर्षीय पुरुष, येळेवाडी (ता. खंडाळा) येथील 70 वर्षीय पुरुष, मुंबई येथून आलेला वासोली (ता. वाई) येथील 47 वर्षीय पुरुष, मुंबई येथून आलेला पिंपोडे  (ता. कोरेगाव) येथील 55 वर्षीय पुरुष.

मुंबई येथून आलेली पारगाव खंडाळा येथील 44 वर्षीय महिला व 55 वर्षीय पुरुष, म्हासोली (ता. कराड) येथील 37 वर्षीय महिला, पाटण येथील निकट सहवासित 26 वर्षीय महिला, 25 वर्षीय महिला, 25 वर्षीय महिला, 36 वर्षीय पुरुष, 31 वर्षीय महिला, 10 व 8 वर्षांचे बालक, 46 वर्षीय पुरुष, 19 वर्षीय पुरुष, 48 वर्षीय पुरुष, 16 वर्षीय युवक, 44 वर्षीय पुरुष, 14 वर्षीय युवक, 19 वर्षीय युवक, 52 वर्षीय महिला, असे एकूण 40 नागरिकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

मलकापूर (ता. कराड) येथील 49 वर्षीय पुरुष  पूर्वीच पॉझिटिव्ह असून दहा दिवसाच्या तपासणी नंतरही तो पुन्हा पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

   
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख