सातारा शहरात कोरोनाचा शिरकाव, जिल्हा रूग्णालयातील महिला कर्मचाऱ्यास संसर्ग

जिल्हा प्रशासन व पोलिसांनी सदरबझार परिसरात तिच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू केला आहे. सातारा शहरात कोरोनाचा शिरकाव झाल्याने सातारकरांना धक्का बसला आहे.
First Patient In Satara City
First Patient In Satara City

सातारा : कोरोनाच्या संसर्गापासून बाजूला असलेल्या सातारा शहरातील सदरबझार परिसरात आज कोरोनाचा रूग्ण सापडला आहे. जिल्हा रूग्णालयात क्ष-किरण विभागात तंत्रज्ञ असलेल्या या महिला कर्मचाऱ्यास कोरोनाची लागण झाल्याचे पुणे येथून आलेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. तर


सातारा जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हा वाढणारा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा महसूल प्रशासन, पोलिस आणि आरोग्य विभाग शर्तीचे प्रयत्न करत आहे. सातत्याने लोकांना घरात थांबा, घराबाहेर पडू नका, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह आणि पोलिस अधीक्षक  तेजस्वी सातपुते करत आहेत.  

आतापर्यंत जिल्ह्यातील आठ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज कऱ्हाडमधील दहा महिन्याच्या बाळासह एक वृध्द महिला व २८ वर्षाच्या युवकाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला असून सातारा जिल्ह्यातील
कोरोनाबाधितांचा एकुण आकडा ४२ आहे.  कोरोना संसर्ग रोखण्यासाठी 23 मार्चपासून जिल्ह्यामध्ये संचार बंदी लागू झाली. त्यानंतर अत्यावश्‍यक सेवा वगळता अन्य व्यवसाय व उद्योग व दुकाने बंद करण्यात आली.

त्याचबरोबर नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली. संचार बंदीनंतर जिल्ह्यामध्ये पहिला रुग्ण आढळला तो खंडाळा तालुक्‍यातील महिला. त्यानंतर कॅलीफॉर्नियावरून आलेल्या खेड परिसरातील एका व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. त्यानंतर निझरे (ता. जावळी) व तांबवे (ता. कऱ्हाड) येथे कोरोना बाधीत आढळले. त्यानंतर जावळी व कऱ्हाडमधील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली. गेल्या आठ दिवसात दरराजे तीन ते चार रुग्ण पॉझीटीव्ह निघत आहेत. त्यामुळे काल जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 41 वर गेली होती.  

आजपर्यंत कऱ्हाड तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनला होता. तेथे तब्बल ३० कोरोनाबाधित रूग्ण आहेत. पण आज सातारा शहरातील सदरबझार परिसरातील
एका महिलेस कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. सदर महिला ही क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रूग्णालयात क्ष किरण तंत्रज्ञ आहे. तीचा कोरोनाचा रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली आहे.

त्यामुळे जिल्हा प्रशासन व पोलिसांनी सदरबझार परिसरात तिच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू केला आहे. सातारा शहरात कोरोनाचा शिरकाव झाल्याने सातारकरांना धक्का बसला आहे.  दरम्यान, साताऱ्यातील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील २०, कै. वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील ३३, कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील ६, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील एक व ग्रामीण रुग्णालय वाई येथील एक असे एकूण ६१ कोरोना संशयितांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे  बी.जे. वैद्यकीय महाविद्यलय पुणे यांनी कळविले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com