Satara : 77 Corona Infected Patients found In District Today | Sarkarnama

सातारकरांची चिंता वाढली : एकाच दिवशी ७७ रूग्ण सापडले, आकडा २७८ वर

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 23 मे 2020

जिल्ह्यात शुक्रवारी एकही बाधीत न सापडल्याने दिलास मिळाला असतानाच आज सकाळी सुमारे ७७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आरोग्य विभागासह जिल्हा हादरून गेला. 

सातारा : सातारा जिल्ह्याला आजचा शनिवार घातवार ठरला. दिवसभरात सकाळी 40, दुपारी सहा तर रात्री नऊ ते दहाच्या दरम्यान, ३१ रूग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे सातारकरांचा काळजाचा ठोकाच चुकला. एकाच दिवशी तब्बल ७७ रूग्ण आढळल्याने कोरोनाचा उद्रेक सु्रू झाल्याचे स्पष्ट झाले. जिल्ह्यातील रूग्णांची संख्या २७८ वर पोहोचली आहे. 

रात्री नऊच्या सुमारास आलेल्या रिपोर्टमध्ये कराड तालुक्यातील 8, वाई तालुक्यातील 8 आणि सातारा तालुक्यातील दहा जणांचा समावेश होता. परवा पाचगणीतील मृत्यू झालेल्या महिलेचाही यात समावेश आहे. त्यामुळे आज दिवसभरात ७७ रुग्ण सापडण्याचा उच्चांक झाला.

 तत्पूर्वी सायंकाळी सहाच्या सुमारास प्राप्त झालेल्या रिपोर्टमध्ये पाटण तालुक्यातील चार तर कऱ्हाड तालुक्यातील म्हासोलीतील दोन बाधीतांचा समावेश आहे. त्यामुळे एका दिवसात जिल्ह्यात ७७ बाधीत रूग्ण सापडल्याने कोरोनाचे सावट गडद झाल्याचे स्पष्ट झाले.जिल्ह्यात शुक्रवारी एकही बाधीत न सापडल्याने दिलास मिळाला असतानाच आज सकाळी सुमारे ७७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आरोग्य विभागासह जिल्हा हादरून गेला. 

यात कऱ्हाड, पाटण, फलटण, माण, सातारा, खंडाळा, वाई तालुक्यातील रूग्णांचा समावेश आहे. एकाच दिवशी ७७ बाधीत रूग्ण सापडण्याची ही पहिलीच वेळ असल्याने लोकांत भितीचे वातावरण निर्माण झाले होते. सायंकाळी सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.  बाधीतामध्ये  पाटण तालुक्यातील ढेबेवाडीतील 18 वर्षीय युवती तसेच २३ वर्षाचा युवक व ४४ वर्षाची महिला, गलमेवाडी येथील २४ वर्षीय महिला तसचे कऱ्हाड तालुक्यातील म्हासोली  येथील १५ वर्षाची मुलगी व १७ वर्षाचा पुरूषाचा समावेश आहे. 

कऱ्हाड तालुक्यातील आठ बाधितांपैकी पाच वानरवाडी येथील तर तीन शेणोली येथील एकाच कुटुंबातील आहेत. एकाच दिवसात बाधीतांची संख्या ७७ झाल्याने  प्रशासनासह आरोग्य विभागही चक्रावून गेला आहे. जिल्ह्यात आजअखेर २७८ बाधीतांची नोंद झाली असून त्यातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख