प्रियंका गांधींना महासचिव केले, आता रॉबर्ट वाड्रा यांना कोषाध्यक्ष करा - सरोज पांडेचा कॉंग्रेसला टोला

 प्रियंका गांधींना महासचिव केले, आता रॉबर्ट वाड्रा यांना कोषाध्यक्ष करा - सरोज पांडेचा कॉंग्रेसला टोला

जालना : सत्तर वर्षांपासून देशात सत्तेवर असलेल्या कॉंग्रेस पक्षाला राष्ट्रीय महिला सचिव गांधी परिवाराबाहेर देता आली नाही. आता प्रियंका यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांना पक्षाचे कोषाध्यक्ष करा असा जोरदार टोला महाराष्ट्राच्या प्रभारी आणि भाजप राष्ट्रीय महासचिव खासदार डॉ. सरोज पांडे यांनी कॉंग्रेसला लगावला. जालना येथील भाजप प्रदेश कार्यसमिती बैठकीत मार्गदर्शन करताना पांडे बोलत होत्या. 

प्रियंका गांधी यांच्या महासचिव पदाच्या नियुक्तीवरून त्यांनी कॉंग्रेसवर निशाणा साधला. पांडे म्हणाल्या, कॉंग्रेसचाच मध्यप्रदेशातील मंत्री म्हणतो आम्ही सुंदर महिलेला सचिव केले. पण भाजपची ही विचारसरणी नाही. आमच्याकडे कर्तृत्व पाहून महिलांना संधी दिली जाते. मी जिल्हास्तरावर काम करून महासचिव पदापर्यंत पोहचले. कॉंग्रेसचे दुसरे नेते म्हणतात आम्ही हुकमाचा एक्का बाहेर काढलाय. मग इतके दिवस तुमचा पक्ष जोकर चालवत होता का ? अशी टीकाही सरोज पांडे यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता केली. या आधीच हुकमी एक्का काढला असता तर देशाचे नुकसान तरी झाले नसते. कॉंगेसलाच राहुल गांधी जोकर वाटतात आणि आमच्यावर त्यांना पप्पू म्हणत असल्याचा आरोप केला जातो असा चिमटा देखील पांडे काढायला विसरल्या नाही. 

सवर्णाचे आरक्षण तुम्हाला दोन्ही हातानी भरभरून देईल 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सवर्णना 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय निवडणुकीत तुम्हाला दोन्ही हातानी भरभरून मदत करेल. 2014 मधील इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन देखील पांडे यांनी उपस्थितांना केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com