sadabhau khot

sadabhau khot

Sarkarnama

महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षात फक्त वाझे वसुली योजना राबवली

सदाभाऊ खोत (sadabhau khot) यांनी राज्य सरकारवर (State Government) जोरदार टीका केली आहे.

मुंबई : राज्य विधीमंडळाच्या सुरू असलेल्या अधिवेशनात महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) आणि विरोधकांमध्ये विविध मुद्यांवरून चांगलीच खडाजंगी होत आहे. दरम्यान, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी सुद्धा राज्य सरकारला विकासाच्या मुद्द्यावरुन चांगलेच धारेवर धरले. विधान परिषदेमध्ये चर्चा होत असताना, दोन वर्षाच्या काळात सरकारने एक तरी योजना जनहिताची राबवली का? असा सवाल करत राबवल्या असल्यास दाखवून द्या, असे आव्हान केेले. तसेच, या सरकारने राज्यात एकच योजना राबवली ती म्हणजे वाझे वसुली योजना, अशी खोचक टीका खोतांनी सरकारवर केली.

<div class="paragraphs"><p>sadabhau khot</p></div>
Dhiraj Deshmukh:केंद्राने सोयापेंडवर लावलेली 'स्टॉक लिमिट'राज्यात लागू करू नका

खोत (Sadabhau Khot) म्हणाले, ग्रामीण भागातील कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. याबाबत मी मटका, गुटखा या चिठ्या सभागृहात दाखवल्या. मात्र, सरकारचे यावर लक्ष नाही. उलट सरकार म्हणते कुठे गुटखा आणि मटका नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अनुपस्थित असल्याने गावोगावी आता मुख्यमंत्री दाखवा बक्षिस मिळवा असे बोलले जात आहे.तर, राज्य सरकार (State Government) अपयशी ठरलेले असून सरकारला मटका, आकडेमोडीतून वसूली असल्याने सरकार यावर कारवाई करत नाही, असा आरोपही त्यांनी केला. तसेच, हे सरकार बहिरे असून लुटमार करणारे सरकार असल्याचा घणाघात करत विविध मुद्द्यावर सरकारला खडेबोल सुनावले.

<div class="paragraphs"><p>sadabhau khot</p></div>
मुख्यमंत्री येणार हे लिहून देऊ का, असे म्हणणाऱ्या अजितदादांचा शब्द फोल ठरला...

दरम्यान, सरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात सरकारवर भाजपनेत्याकडून जोरदार टीका केली जात आहे. आज (ता.28 डिसेंबर) माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही सरकारवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, आपण शाळेत शिकत असताना आपल्याला शिक्षक नेहमी म्हणायचे की, महाराष्ट्रात एकविसाव्या शतकात 'जमिनो के और कमिनो के ज्यादा भाव होंगे', अशीच परिस्थिती महाराष्ट्रात आज निर्माण झाली आहे. महिलांवरील सामूहिक बलात्कारांच्या घटनांनी तर, राज्याला लाज आणली आहे. पण गृहविभाग यावर विचार करायलाही तयार नाही. वळसे पाटील हे सरकारमधील केवळ नामधारी गृहमंत्री आहेत. कार्यकारी गृहमंत्री तर अनिल परब असल्यासारखे वागतात, असे ते म्हणाले. पोलिस दलात गृहमंत्र्यापासून तर अधिकाऱ्यांपर्यंत सारेच भ्रष्टाचारात माखले आहेत, असा घणाघात मुनगंटीवारांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com