रविंद्र वायकर यांचं नव्यानं पुनर्वसन ; सीएमओ पदी नियुक्ती...

शिवसेनेच्या खासदार, आमदारांनी कामांचा पाठपुरावा CMO म्हणून रवींद्र वायकरांकडे करावा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
ravindra.jpeg
ravindra.jpeg

मुंबई : शिवसेना आमदार आणि माजी मंत्री रवींद्र वायकर यांची मुख्यमंत्री कार्यालय प्रमुख पदावर (CMO) नियुक्ती होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या आमदारांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली होती. बैठकीत रवींद्र वायकर हे मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतील CMO म्हणून काम करतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

शिवसेनेच्या खासदार, आमदारांनी अडलेल्या कामांचा पाठपुरावा CMO म्हणून रवींद्र वायकरांकडे करावा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. शिवसेना आमदारांसोबत चार तास ही बैठक झाली. आज सांयकाळी महाविकास आघाडी सरकारमधील महत्वाच्या नेत्यांची होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार याच्या उपस्थिती ही बैठक होणार आहे.  

सीएमओ म्हणून रविंद्र वायकर यांची काही महिन्यांपूर्वी केलेली नियुक्ती रद्द केली होती. पण मुख्यमंत्र्याच्या या आदेशामुळे वायकर याच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. यापूर्वी या पदावर वायकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. याबाबतचा आदेश मंत्रालयाने काढला होता. पण काही तांत्रिक कारण पुढे करून विरोधकांनी यावर आक्षेप घेतला होता. त्यामुळे वायकर यांना या पदाला मुकावे लागले होते. महाविकास आघाडी सरकारमधील सर्व आमदार आणि खासदार यांच्यात समन्वय राहावा, त्यांच्या मतदारसंघातील प्रश्नं तातडीने सोडवण्यासाठी रविंद्र वायकर यांच्याकडे पाठपुरावा करावा, असे काल झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री कार्यालयात प्रमुख समन्वयक पदावर 11 फेब्रुवारीला रवींद्र वायकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. तर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांची 14 फेब्रुवारी रोजी राज्य संसदीय समन्वय समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती, पण ही दोन्ही पदे हे सरकारी लाभांची पदे असल्यामुळे वेतन, भत्ते, अन्य सुविधा यामुळे या निवडीमुळे वाद निर्माण झाला होता. भाजपने 'ऑफिस ऑफ प्रॉफिट'नुसार, या निवडीवर आक्षेप घेऊन याला कडाडून विरोध केला होता. याबाबत न्यायालयात जाण्याची तयारीही भाजपने केली होती. यानंतर वायकर आणि सावंत यांच्याकडून राजीनामे दिले होते. पण आता सर्व तांत्रिक अडचणी दूर झाल्याने वायकर हे लवकरच सीएमओचा पदभार स्वीकारतील, असे समजते. मुख्यमंत्री कार्यालया यासाठी तयारीला लागले आहे.  

रवींद्र वायकर हे मुंबई महानगर पालिकेत वीस वर्षे नगरसेवक होते. या काळात त्यांनी चारवेळा महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषवले . मुंबईशी संबधित प्रश्न सोडवण्यात त्यांना अनुभव आहे . ते 2009 पासून विधानसभेचे सदस्य आहेत. त्यामुळे त्यांचा कामाचा अनुभव लक्षात घेऊन त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयात अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. त्यात हे तीन पक्षांचे सरकार असल्याने प्रत्येक पक्षातील नेत्यांचे समाधान आता वायकर यांना करावे लागेल. प्रशासकीय कामापेक्षाही लोकप्रतिनिधींच्या कामकाजात आणि राजकीय नेमणुकांत त्यांना जास्त लक्ष घालावे लागणार आहे. 
 Edited  by : Mangesh Mahale   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com