त्या फोनमुळे राजीव गांधी नेहमीच माझ्या स्मरणात राहिले...: पृथ्वीराज चव्हाण

राजीव गांधी यांनी राजकारणात 1991 मध्ये तरूणांना संधी देण्याचा विचार केला आणि लोकसभेसाठी कऱ्हाड मतदार संघातून आमदार चव्हाण यांच्या नावाला थेट राजीव गांधी यांनीच पसंती दिली. त्या काळात मिळलेल्या त्या संधीमुळे राजीव गांधी यांच्याशी त्यांचा स्नेह वाढला.
Rajiv Gandhi and Prithviraj Chavan
Rajiv Gandhi and Prithviraj Chavan

कऱ्हाड : पहाटे तीनच्या सुमारास फोन खणखणला... तुम्हाला खासदारकीची निवडणुक लढवायची आहे, पलीकडून निरोप आला आणि तीच माझी राजकीय क्षेत्रातील एन्ट्री ठरली. तो फोन होता, देशाचे माजी पंतप्रधान (कै.) राजीव गांधी यांचा आणि तो काळ होता 1991 चा... माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आठवण जागवली.

त्या फोनव्दारे आमदार चव्हाण यांना काँग्रेसतर्फे पहिली संधी मिळाली. त्यानंतर अनेक राष्ट्रीय स्तरावरील पदे आमदार चव्हाण यांनी पादाक्रांत केली. 2010 नंतर त्यांनी सलग चार वर्षे राज्याचे मुख्यमंत्री म्हणूनही यशस्वी कारकीर्द केली आहे.

आमदार चव्हाण उच्च विद्याविभूषीत आहेत. त्यांचा बराच कालवधी दिल्लीत गेला. त्यांच्या मातोश्री(कै.) प्रेमलाकाकी चव्हाण काँग्रेसच्या खंद्या समर्थक होत्या. (कै.) इंदीरा गांधी यांच्या त्या निकटच्या सहकारी होत्या. त्यामुळे कॉग्रेससह गांधी घराशी आमदार चव्हाण यांच्या घराचा जवळचा संबध आहे. त्यातून (स्व) राजीव गांधी यांच्याशी आमदार चव्हाण यांची मैत्री होती. (कै.) राजीव गांधी यांनी संगणकाची क्रांती देशात आणली.

 त्या क्रांतीचे आमदार चव्हाण त्याकाळचे शिलेदार आहेत. आमदार चव्हाण यांनी त्या काळात संगणक प्रणालीबाबात बरेचशे काम केले आहे. त्या कामातूनही आमदार चव्हाण व राजीव गांधी यांची मैत्री फुलत गेली. राजीव गांधी यांनी राजकारणात 1991 मध्ये तरूणांना संधी देण्याचा विचार केला आणि लोकसभेसाठी कऱ्हाड मतदार संघातून आमदार चव्हाण यांच्या नावाला थेट राजीव गांधी यांनीच पसंती दिली. त्या काळात मिळलेल्या त्या संधीमुळे राजीव गांधी यांच्याशी त्यांचा स्नेह वाढला. ते पुढे अधिक दृढ झाला. 

माजी पंतप्रधान (कै.) राजीव गांधी म्हणजे आधुनिक भारताचा पाया घावलणारे दृष्टी व्यक्ती होती, अशी त्यांची आठवण आमदार चव्हाण यांना यावेळी ताजी केली. ते म्हणाले, राजीव गांधी यांनी नेहमीच प्रगतशील भारताचे स्वप्न पाहणारा नेते होते. त्यांचे अकाली झालेल्या निधनाने भारताचे नुकसान झाले आहे. राजीव गांधी यांनी नेहमीचआधुनिक भारत निर्माणाचे स्वप्न पाहिले. त्यामुळे ते खऱ्या अर्थाने भारतरत्न आहेत. आजच्या राजकीय क्षेत्रातील नेत्यांनी त्यांच्या प्रगतशील विचारांचा आदर्श घेण्यासारखा आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com