प्रकाश आंबेडकरांनी बोलण्याच्या पहिले भान ठेवावे : राजे मुधोजी भोसले - Raje Shrimant Mudhoji Bhosale criticizes Prakash Ambedkar | Politics Marathi News - Sarkarnama

प्रकाश आंबेडकरांनी बोलण्याच्या पहिले भान ठेवावे : राजे मुधोजी भोसले

अतुल मेहेरे
शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2020

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जडणघडणीसाठी हेच मराठे, राजे पुढे आले होते. त्यांच्या जडणघडणीत छत्रपतींचा मोलाचा मोठा वाटा आले, हे अॅड. आंबेडकरांनी विसरू नये

नागपूर : अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याबद्दलचे वक्तव्य केले, त्याचे पडसाद राज्यभर उमटायला सुरूवात झाली याहे. त्यांचे पूर्वज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जडणघडणीसाठी हेच मराठे, राजे पुढे आले होते. त्यांच्या जडणघडणीत छत्रपतींचा मोलाचा मोठा वाटा आले, हे अॅड. आंबेडकरांनी विसरू नये, अशा शब्दांत नागपूरचे राजे श्रीमंत मुधोजी भोसले यांनी प्रकाश आंबेडकरांचा समाचार घेतला.  

"उदयनराजे भोसले हे बिनडोक आहेत, त्यांना भाजपने कसं काय खासदार केलं, अशा प्रकारच आक्षेपार्ह वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केल्यानंतर छत्रपतींचे वंशज संतापले आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी बिनडोक हा शब्द एका राजघराण्यासाठी छत्रपती घराण्याला वापरलेला आहे, त्यांचे हे वक्तव्य अशोभनीय आहे, त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. आंबेडकरांनी बोलायच्या पहिले भान ठेवावं, असंही राजे श्रीमंत मुधोजी भोसले म्हणाले. 

छत्रपती घराण्याला, छत्रपतींच्या गादीला संपूर्ण महाराष्ट्रातील जनता वंदन करते, हे अॅड. आंबेडकरांनी आधी समजून घ्यावे," असा सल्ला राजे मुधोजी भोसले यांनी आंबेडकरांना दिला आहे. 

"आरक्षणासंदर्भात साताऱ्याची गादी आणि कोल्हापूरच्या गादीच्या प्रतिनिधींनी त्यांची भूमिका आधीच स्पष्ट केली आहे, असे असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना घडवणारे छत्रपती शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड महाराज यांचा फार मोठा वाटा आहे, हे तरी त्यांनी लक्षात ठेवावे. आंबेडकरांनी अतिशय, बिनडोकपणाचे वक्तव्य केलेले आहे. महाराष्ट्रातले तिन्ही राजे आरक्षणासंदर्भात समाजासोबत संपूर्ण शक्तिनिशी उभे आहेत, हे आंबेडकरांनी विसरू नये," असे राजे मुधोजी भोसले यांनी सांगितले. 

संबंधित लेख