राज्याला काही वेगळी अक्कल आहे का? राज ठाकरे कडाडले!

जिम सुरु करुन दिलासा द्यावा या अपेक्षेने आज जिम असोसिएशन, बाॅडी बिल्डर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांची 'कृष्णकुंज' निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी राज यांनी 'जिम सुरु करा. पुढचे पुढे पाहू,' असे या जिमचालकांना ठामपणे सांगितले
Raj Thakre slams government over opening of Gyms
Raj Thakre slams government over opening of Gyms

मुंबई : जिम बंद ठेवणे, खेळ बंद ठेवणे हा लाॅकडाऊनच्या नांवाखाली सगळा मुर्खांचा बाजार सुरु आहे, अशी कडाडून टिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला उद्देशून केली. सगळीकडे सगळ्या बाकीच्या गोष्टी सुरु आहेत. जिम सुरु करा, ज्याला यायचे आहे तो येईल. सगळ्या गोष्टींची काळजी घ्या, आणि करा सुरु, असेही त्यांनी जिमचालकांना सांगितले. केंद्र सांगतं जिम सुरु करा, विमानतळ सुरु करायला सांगितलं, राज्य म्हणतं आम्ही नाही करणार, मग राज्याला काही वेगळी अक्कल आहे का? असा सवालही त्यांनी विचारला.

कोरोनाचा लाॅकडाऊन झाल्यापासून जिम, व्यायामशाळा बंद आहेत. अनेकांनी यात मोठी गुंतवणूक केली आहे. मात्र, राज्यातल्या जिम अद्याप सुरु न झाल्याने जिम चालक अत्यंत अडचणीत आले आहेत. घेतलेले कर्ज, जागांचे भाडे असा सगळाच भार त्यांच्या डोक्यावर आहे. त्यामुळे जिम सुरु करुन दिलासा द्यावा या अपेक्षेने आज जिम असोसिएशन, बाॅडी बिल्डर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांची 'कृष्णकुंज' निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी राज यांनी 'जिम सुरु करा. पुढचे पुढे पाहू,' असे या जिमचालकांना ठामपणे सांगितले. मी या संदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो असून नियम पाळून जिम सुरु करायला हरकत नाही, असे त्यांचेही मत असल्याचे राज यांनी यावेळी सांगितले. 

शरीर सौष्ठवपटू मनिष आडविलकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आज राज यांची भेट घेतली. जिम सुरु करण्यासाठी राज्य शासनाने परवानगी द्यावी व या करता मनसे अध्यक्षांनी पुढाकार घ्यावा, यासाठी राज यांना निवेदन देण्यात आले. अनलाॅकच्या तिसऱ्या टप्प्यात केंद्र सरकारने जिम सुरु करायला काही अटींवर परवानगी दिली आहे. ५ आॅगस्टपासून जिम सुरु होणे अपेक्षित होते. मात्र, राज्य शासनाने अद्याप जिम सुरु करायला परवानगी दिलेली नाही. त्यामुळे राज्यभरातले जिमचालक नाराज आहेत.

राज म्हणाले...पुढचं पुढं बघू

आज या जिमचालकांशी राज यांनी चर्चा केली व त्यांना जिम सुरु करण्यास सांगितले. पाच तारखेला पोलिस आले होते व ते म्हणाले जिम सुरु करू नका, असे एका जिमचालकाने सांगितल्यावर ''आता मी सांगतोय ,सुरु करा,'' असे राज यांनी ठामपणे सांगितले. तुम्ही किती दिवस लाॅकडाऊन मध्ये काढणार आहात, प्रत्येक जण आपापली काळजी घेईल, असेही राज म्हणाले. केंद्राने ज्या काही सूचना दिल्या आहेत, त्या पाळून तुम्ही जिम सुरु करा. बघू पुढचे पुढे,'' असेही ठाकरे यांनी जिमचालकांना सांगितले. 

उपाययोजना घेतल्या जाणून

गोल्फ आणि टेनिस याच्या पेक्षा फिजिकल डिस्टन्सिंग अधिक काय असू शकते? मधू इथे आणि चंद्र तिथे अशी स्थिती असते. शेवटी मी त्यांना काय करायचे ते करु द्या म्हणून स्वतः खेळायला सुरुवात केली, असेही राज यांनी सांगितले. कारवाई होण्याची भिती जिम चालकांनी यावेळी व्यक्त केली. त्यावेळी 'कसली कारवाई?' असा प्रश्न राज यांनी विचारला. सगळीकडे मार्केट चालू आहेत. मग काय कारवाई करणार, असेही राज म्हणाले. पहिलं मला सांगा, जिम सुरु केल्यानंतर काळजी कशी घेणार? असा प्रश्नही राज ठाकरे यांनी विचारला व जिम सुरु करण्याच्या उपाययोजना जाणून घेतल्या.  
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com