काल कॉलेज आणि आज हॉटेलवर छापा, अनिल देशमुखांवरील फास आवळला…

देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ईडीने दोन वेळा समन्स बजावूनही ते हजर राहिलेले नाहीत. त्यामुळे त्यांचा शोध घेण्यात येत आहे.
काल कॉलेज आणि आज हॉटेलवर छापा, अनिल देशमुखांवरील फास आवळला…
Anil Deshmukh - Hotel.

नागपूर : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख Former home minister of the state Anil Deshmukh यांच्यावर माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंह यांनी Parambir Singh गंभीर आरोप केल्यानंतर त्यांच्या अडचणी सातत्याने वाढत चालल्या आहेत. काल देशमुखांच्या माहुरझरी येथील साई शिक्षण संस्थेद्वारा संचालित नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या कॉलेजवर ईडीने छापा घातल्यानंतर आज वर्धा मार्गावरील त्यांच्या ट्राय हॉटेलवरही आज ईडीने छापा घातला. ED's raid on try hotel of the wardha road. 

ईडीच्या आजच्या कारवाईने अनिल देशमुखांच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे. आता त्यांचा पाय खोलात असल्याचे सांगितले जात आहे. चौकशीसाठी समन्स बजावूनही हजर राहात नसल्याने ईडीने छापासत्र चालविले असल्याची चर्चा होत आहे. अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्यासाठी सांगितल्याचा आरोप केल्यापासून हे प्रकरण सुरू झाले. त्यानंतर या अंकात माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंह यांचा प्रवेश झाला. त्यानंतर चिघळत गेलेले हे प्रकरण आता ईडीच्या छापासत्रापर्यंत आले आहे. अनिल देशमुख कुठे आहेत, हे सध्या ईडीच्या अधिकाऱ्यांनाही माहिती नाही, असे सांगितले जात आहे. 

अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) पथकाने काल काटोल रोडवरील फेट्री या गावाजवळ असलेल्या माहुरझरी येथील त्यांच्या साई शिक्षण संस्थाद्वारा संचालित एनआयटी कॅम्पस या कॉलेजवर छापा घातला. या छापासत्रामध्ये अधिकाऱ्यांच्या चमूसोबतच राज्य राखीव पोलिस दलाची एक तुकडीही तैनात करण्यात आली होती. आणि आज त्यांच्या हॉटेलवर घातलेला छापा हा त्यांच्यावरील कारवाईचा फास आवळला जात असल्याचे दिसत आहे. 


अनिल देशमुख साई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत. तर त्यांचा मोठा मुलगा सलिल हा या संस्थेचा सचिव आहे. त्यांची पत्नी आरती देशमुखही या संस्थेच्या उपाध्यक्ष आहेत. अनिल देशमुख यांचा पीए म्हणून अनेक वर्षे काम पाहत असलेला कुंदन शिंदे हा देखील या संस्थेवर पदाधिकारी आहे. कुंदन आणि दुसरे स्वीय सहायक संजीव पलांडे यांना या आधीच ईडीने अटक केली आहे. ईडीने देशमुख यांच्या घरीही छापासत्र राबविले होते. त्यानंतर आज त्यांच्या कॉलेजवर ही कारवाई सुरू आहे. साई शिक्षण संस्था ही तीच संस्था आहे की ज्याच्या खात्यावर कोट्यवधी रुपये हवालामार्फत जमा करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलेला आहे.

देशमुख आणि त्यांच्या मुलाला ईडीने चौकशीसाठी बोलविले होते. मात्र याबाबत देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ईडीने दोन वेळा समन्स बजावूनही ते हजर राहिलेले नाहीत. त्यामुळे त्यांचा शोध घेण्यात येत आहे. दुसरीकडे भाजपचे नेते किरीट सोमय्या हे देशमुख हे फरार असल्याचा आरोप करत आहेत. ईडी ही कायद्यानुसार चौकशी करत नसल्याचा आक्षेप देशमुख यांच्या वकिलांनी घेतला आहे. चौकशीला सहकार्य करूनही ईडी वारंवार त्रास देत असल्याची भूमिका देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात मांडली आहे. तेथे त्यांना दिलासा मिळणार का, याची आता उत्सुकता आहे. 
Edited By : Atul Mehere

Related Stories

No stories found.