पृथ्वीराज चव्हाणांच्या 'त्या' वक्तव्यामुळे राजकारणात खळबळ

राहूल गांधी व पृथ्वीराज चव्हाण यांच्या या वादग्रस्त वक्तव्याचा शिवसेना व राष्ट्रवादीचे नेते कोणता अर्थ काढणार व त्यावर त्यांची भुमिका काय राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Prithviraj Chavan
Prithviraj Chavan

सातारा :  मंत्रीमंडळात मी नाही, सरकारपण आमचं नाहीये. शिवसेनेचे सरकार आहे, अशा आशयाची माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांची ऑडीओ क्लीप
व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांतील हालचालीही गतीमान झाल्या आहेत. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यामुळे कोणती राजकिय उलथापालथ होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

त्यातच महाविकास आघाडीला आमचा पाठींबा आहे. पण ठाकरे सरकारमध्ये काँग्रेसला मोठ्या निर्णयाचे अधिकार नाहीत, असे वक्तव्य करून राहूल गांधी यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना साथच दिली आहे.   

राज्यातील महाविकास आघाडीत चांगला समन्वय असून हे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल, असा विश्वास नुकताच खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. पण
आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची समाज माध्यमात व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमुळे मात्र, सर्वांच्या भुवया
उंचावल्या आहेत.

 
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी असे वक्तव्य केल्याच्या दावा राजकीय पटलावर त्या ऑडीओ क्लीपच्या माध्यमातून अनेक राजकीय नेत्यांसह पक्ष करत
आहेत. ऑडिओ क्लिप सोशल मिडियावर व्हायरल झाली. त्यामुळे त्याची राजकीय वर्तुळात जोरादार चर्चा झाली. श्री. चव्हाण यांच्या व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये ते
एका कार्यकर्त्याशी मोबाईलवरून संवाद साधत होते. काही कामानिमित्त कार्यकर्त्याने फोन केला होता. त्यामध्ये त्याने निधीचा विषय काढला होता.

त्याला समजावून सांगताना श्री. चव्हाण यांनी मी मंत्रीमंडळात नाही. सरकारही आमचं नाही. सध्या राज्यात शिवसेनेचे सरकार आहे, असे विधान त्यांनी केले आहे. श्री. चव्हाण यांच्या या वक्तव्यामुळे राजकिय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मी केवळ सरकारला शिफारस करू शकतो असेही श्री. चव्हाण त्या कार्यकर्त्याला सांगत
आहेत. या व्हायरल ऑडिओ क्लिपबाबत श्री. चव्हाण यांनी आपली भुमिका अद्याप मांडलेली नाही. 

ही सर्व घडामोड सुरू असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपालांची घेतलेली भेट आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन घेतलेली भेट यातून काहीतरी मोठी घडामोड घडणार असा अंदाज राजकिय वर्तूळातून व्यक्त होऊ लागला आहे. त्यात भर म्हणजे काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी महाविकास आघाडीला आमचा पाठींबा आहे, पण ठाकरे सरकारमध्ये काँग्रेसला मोठ्या निर्णयाचे अधिकार नाहीत, अशी खंत व्यक्त केली आहे.

त्यामुळे राहूल गांधी व पृथ्वीराज चव्हाण यांच्या या वादग्रस्त वक्तव्याचा शिवसेना व राष्ट्रवादीचे नेते कोणता अर्थ काढणार व त्यावर त्यांची भुमिका काय राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com