प्रीतम मुंडे म्हणाल्या, विकासाच्या नावाखाली खड्डे; पाया मजबूत करतोय म्हणत धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर..

मी आपल्या परळीच्या विकास कामांचा पाया पक्का करत असल्यानेच प्रीतम मुंडे यांना या ठिकाणी येण्यास वेळ लागला असावा.
प्रीतम मुंडे म्हणाल्या, विकासाच्या नावाखाली खड्डे; पाया मजबूत करतोय म्हणत धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर..
Mp Dr.Pritam Munde-Dhnanjay Munde News parali-beed

परळी वैजनाथ : येथील ब्राह्मण महासभेच्या वतीने विठ्ठल मंदिर जिर्णोध्दार व स्वर्गीय मनोहरपंत बडवे सभागृहाच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे व खासदार डॉ प्रितम मुंडे हे बहीण-भाऊ व एकमेकांचे राजकीय विरोधक अनेक दिवसानंतर एकत्र आले होते. (Pritam Munde said, pits in the name of development; Dhananjay Munde's reply saying he is strengthening the foundation) त्यामुळे या कार्यक्रमाच्या मंचावर चांगलीच टोलेबाजी झाली.

खासदार डॉ प्रितम मुंडे म्हणाल्या, मला कार्यक्रमाला येण्यास उशीर झाला, म्हणजे मी मुंडेची कन्या म्हणून उशीर झाला नसून कार्यक्रमास वेळेवर पोहचावे असेच प्रयत्न असतात. (Minister Dhnanjay Munde,Maharashtra) मी वेळेत पोहचता यावे यासाठी बीडहून परळी ९० किलोमीटरचे अंतर फक्त सव्वातासात पूर्ण केले.

पण शहरात विकास कामाच्या नावाखाली सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत.( Mp Dr. Pritam Munde, Beed) त्यामुळे मला इटके काँर्नरहून कार्यक्रमास येण्यास जास्त वेळ लागला, असे सांगत त्यांनी व्यासपीठावर बसलेल्या धनंजय मुंडे यांना टोला लगावला.

तर आपल्या प्रत्युत्तरात 'मी पाहिलेलं स्वप्न आणि तुम्ही पाहिलेलं परळीचा विकासाच स्वप्न लवकरच साकार होणार आहे. मात्र यासाठी मुळात पाया पक्का करावा लागतो आणि हा पाया पक्का करण्यासाठीच वेळ लागतो आहे. परळीत सुरू असलेले रस्त्याचे काम आधी पक्के करत असल्याचे सांगत धनंजय मुंडे यांनी देखील प्रीतम मुंडेना जशास तसे उत्तर देत चिमटा काढला.

मी आपल्या परळीच्या विकास कामांचा पाया पक्का करत असल्यानेच प्रीतम मुंडे यांना या ठिकाणी येण्यास वेळ लागला असावा, असे मला वाटते म्हणत खासदार मुंडे यांची फिरकी घेतली.  

गेल्या अनेक वर्षानंतर मुंडे बहिण भाऊ या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आले व राजकीय जुगलबंदी रंगली. त्यामुळे दोघांच्याही समर्थकांना काही काळापुरते का होईना, पण हायसे वाटले असणार.

Edited By : Jagdish Pansare
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in