महापूर टाळण्यासाठी मागेल त्याला शेततळे द्या : विक्रमसिंह पाटणकर  

शेततळी झाली, तर पाणी साठविले जाईल. त्या पाण्यातून डोंगर उतार शेतीसह वृक्षलागवडीखाली येतील आणि महापुराचा होणारा धोका टाळण्यासाठी आता जलसंपदा विभागाने पुढाकार घेऊन पश्‍चिम घाटातील डोंगर उतारावरील शेतकऱ्यांना शेततळी देण्याचा निर्णय अमलात आणणे गरजेचे आहे, असे पाटणकरयांनी स्पष्ट केले.
NCP Leader Vikramsinh Patankar
NCP Leader Vikramsinh Patankar

पाटण (जि. सातारा) : कऱ्हाड, कोल्हापूर व सांगली शहरांबरोबर आसपासच्या गावांचा महापुरातील धोका टाळण्यासाठी व ऑगस्ट, सप्टेंबरमधील महापूर टाळण्यासाठी राज्य शासनाने सह्याद्रीच्या डोंगर उतारावरील शेतकऱ्यांना मागेल त्याला शेततळे द्यावे. त्यासोबत लघुपाटबंधारे प्रकल्प राबवावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी केली आहे.

 पाटण येथील त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पश्‍चिम घाटातील शेतकऱ्यांना मागेल त्याला शासनाच्या खर्चाने शेततळे दिले, तर पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी साठविले जाऊ शकते, असे स्पष्ट करून श्री. पाटणकर म्हणाले, "पाटण तालुक्‍याचा विचार करून हा प्रकल्प राबविल्यास हजारो एकर शेती बागायतीखाली येईल.

पाणी उपलब्ध झाले, की पडीक शेतीत बागायती पिके होतील. मुंबई-पुणे शहरात जाणारा स्थानिक तरुण गावातच आपले करिअर निर्माण करेल. डोंगर उतारावरून वाहून जाणारे पाणी शेततळी व लघुपाटबंधाऱ्यात साठविले, तर अतिवृष्टीत निर्माण होणारा महापुराचा धोका टळू शकतो. शासनाने ही योजना चळवळ म्हणून राबविली, तर 25 ते 30 टीएमसी पाणी पश्‍चिम घाटाच्या डोंगर उतारावर साठविले जाऊ शकते.

हे पाणी पुन्हा विजेचा वापर न करता सायपन पद्धतीने शेतीला देऊन विजेची बचत होईल.'  डोंगर उतारावरील लहरी मॉन्सूनवरील खरीप शेती सोडली, तर पुन्हा ही शेती पडून असते. शेततळी झाली, तर पाणी साठविले जाईल. त्या पाण्यातून डोंगर उतार शेतीसह वृक्षलागवडीखाली येतील आणि महापुराचा होणारा धोका टाळण्यासाठी आता जलसंपदा विभागाने पुढाकार घेऊन पश्‍चिम घाटातील डोंगर उतारावरील शेतकऱ्यांना शेततळी देण्याचा निर्णय अमलात आणणे गरजेचे आहे, असे पाटणकर
यांनी स्पष्ट केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com