दरेकर म्हणाले ही तर पालकमंत्र्यांची दुकानदारी...खासदार तटकरेंनी दिले हे उत्तर - pravin darekar criticizes minister aditi tatkare on gauradian minister helpline | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल

दरेकर म्हणाले ही तर पालकमंत्र्यांची दुकानदारी...खासदार तटकरेंनी दिले हे उत्तर

सुनील पाटकर
मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020

दरेकरांच्या आरोपांनी खासदार तटकरे व्यतिथ 

महाड : रायग़ड जिल्ह्यातील सर्व विभागाच्या जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय कार्यालयांमध्ये पालकमंत्री कक्ष स्थापन करण्याचे आदेश जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी  दिले असुन या विरोधा भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी चांगलीच तोफ डागली आहे. मुलीच्या निर्णयावरील आरोपाचे खंडन करण्यासाठी खासदार सुनील तटकरे ही मागे राहिले नाही.

रायगड जिल्ह्यातील दक्षिण भाग तसेच पेण येथे अवकाळी पावसाने  नुकसान झालेल्या भातशेती पाहणीचा दौरा प्रविण दरेकर यांनी केला. या दौऱ्या दरम्यान त्यांनी रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या पालकमंत्री कक्ष सुरू करण्याच्या  निर्णयावर टिका केली. हा निर्णय जनतेच्या हितासाठी  घेण्यात आलेला नाही तर प्रत्येक तालुक्यात प्रत्येक तहसील कार्यालयात पालकमंत्री कक्ष असला म्हणजे आपल्याला राजकीय दुकानदारी करता येईल या राजकीय उद्देशानेच हे सर्व होत असल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला.

पालकमंत्री कक्ष स्थापन करण्याचा निर्णय धोरणात्मक असता तर सरकारी पातळीवर तो संपूर्ण राज्यासाठी  लागू
करण्यात आला असता. फक्त एखाद्या जिल्ह्यासाठी असा निर्णय घेता येत नाही. अन्यथा उद्या प्रत्येक आमदारांच्या मनात आलं तर ग्रामपचांयत आणि पचांयत समिती कार्यालयातही आमदार कक्ष स्थापन केला तर चालेल का असा प्रतिटोलाही
दरेकर यांनी लगावला. प्रत्येक तालुक्यात महसूल यत्रंणा असताना राजकीय व्यवस्था उभ्या राहील्या तर राजकीय संघर्ष उभा राहील. लोकांसाठी लोकांमध्ये मिसळून त्यांची दु:ख समजून उपाययोजना केल्या तर अशा कक्षांची
आवश्यकता नाही. त्यामुळे प्रत्येक कार्यालयात पालकमंत्री कक्ष स्थापन करण्याचा निर्णय योग्य वाटत नाही  अशी भूमिका दरेकर यांनी मांडली. दरेकर यांनी शेताच्या बांधावर जाऊन नुकसानीचा पाहणी केली शेतक-यांना जास्तीतजास्त मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करु अशी ग्वाही त्यांनी शेतक-यांना दिली.

आपल्या मुलीच्या निर्णयावर घेतलेले आक्षेप सहन करणारे खा सुनील तटकरे  नव्हते .राजकारणातील मुरब्बी खा.सुनील तटकरे यावर गप्प बसणारे नव्हते. आपल्याकन्येवर झालेले आरोप त्यांनी फेटाळले. शिवसेनेतून मनसेत व नंतर मनसेतून भाजपत गेलेले दरेकर हे विरोधी पक्ष नेते झाल्यावर आम्ही त्यांचे स्वागतच केले होते. त्यामुळे त्यांनीही पालकमंत्र्यांनी घेतलेल्या पालकमंत्री कक्ष स्थापनेचे स्वागत करावे असे प्रत्युत्तर देत दरेकरांना शालजोडीतील दिली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख