प्रभाकर देशमुखांना मुले म्हणतात, `मला कलेक्टर व्हायचंय....'

माण खटाव विधानसभा मतदारसंघात शैक्षणिक,औद्योगिक,शेती,आरोग्य क्षेत्राची क्रांती करण्यासाठी 'मला आमदार व्हायचंय' म्हणणाऱ्या माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुखांची वेगळी क्रेझ लहान मुलांमध्येही दिसून येत आहे. 'मला कलेक्टर व्हायचंय ' असा निर्धार ही मुले त्यांच्याकडे व्यक्त करत आहेत.
प्रभाकर देशमुखांना मुले म्हणतात, `मला कलेक्टर व्हायचंय....'

गोंदवले (ता. माण ) : माण खटाव विधानसभा मतदारसंघात शैक्षणिक,औद्योगिक,शेती,आरोग्य क्षेत्राची क्रांती करण्यासाठी 'मला आमदार व्हायचंय' म्हणणाऱ्या माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुखांची वेगळी क्रेझ लहान मुलांमध्येही दिसून येत आहे. 'मला कलेक्टर व्हायचंय ' असा निर्धार ही मुले त्यांच्याकडे व्यक्त करत आहेत.

राज्यात सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यासाठी २८८ मतदारसंघातुन उमेदवार आपली परीक्षा देत आहेत. परंतु माण विधानसभा मतदारसंघ यावेळी अनेकविध कारणाने या राजकीय पटलावर अग्रभागी असल्याचे पाहायला मिळत आहे. यापैकी आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथील माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख याच मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. 

श्री. देशमुख यांनी प्रांताधिकारी पदापासून जलसंधारण सचिव, विभागीय आयुक्त पदापर्यंतची प्रशासकीय सेवा बजावली आहे. या काळात त्यांनी प्रामुख्याने दुष्काळी भागाचा कायापालट करण्यासाठी शासन पातळीवरून केलेले प्रयत्न यशस्वी ठरले आहेत. पाणीप्रश्नांच्या सोडवणुकीसाठी शासनाच्या जोडीला लोकसहभाग मिळवून देण्यात त्यांचा मोठा सहभाग राहिला आहे. यातूनच सर्वसामान्यांपर्यँत त्यांची वेगळी छाप पोचली आहे. प्रशासनातील उच्च पदस्थ अधिकारी राहिलेल्या प्रभाकर देशमुख यांनी या निवडणुकीच्या प्रचारात घेतलेले मुद्दे मतदारांसाठी अश्वसित करणार आहेत. सध्या गावागावात मतदार नसलेल्या लहान मुलांवर वेगळी छाप पडत आहे. त्यामुळे या शाळकरी मुलांमध्ये देशमुख यांची वेगळी क्रेझ पाहायला मिळत आहे.

निवडणुकीतील प्रचारासाठीच्या गावभेटीदरम्यान, दिडवाघवडी येथे मतदारांबरोबरच शाळकरी मुलेही श्री. देशमुखांची आवर्जून भेट घेत आहेत. आम्हीही खूप शिक्षण घेणार असून त्यासाठी कोणतेही कष्ट करण्याची तयारी असल्याचे ही मुले सांगत आहेत.इतकेच नव्हे तर श्री. देशमुख यांच्या प्रश्नाला 'मला ही कलेक्टर व्हायचंय 'असा निश्चयी उत्तर मुलांकडून मिळत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com