93 नगरपंचायतींच्या 336 जागांसाठी मतदानाचा धुरळा

राज्यात एकूण 106 नगरपंचातींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या.
local body Election
local body ElectionSarkarnama

पुणे : उद्या मंगळवारी (ता.18 जानेवारी) राज्यातील 93 नगरपंचायतींच्या 336 जागांसाठी मतदानाचा धुरळा उडणार आहे. राज्यात एकूण 106 नगरपंचातींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यातील पालघर- तलासरी, विक्रमगड, मोखाडा, नाशिक- पेठ, सुरगाणा, नंदुरबार- धडगाव- वडफळ्या- रोषणमाळ, यवतमाळ- झरी- जाणणी, गडचिरोली- मुलचेरा, एटापल्ली, कोरची, भामरागड या 11 नगरपंचायतींमध्ये एकही जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी राखीव नव्हती. त्यामुळे तेथे सर्व जागांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान पार पडले होते.

उरलेल्या 95 नगरपंचायतीतील अनारक्षित झालेल्या 344 जागांसाठी 18 जानेवारी 2022 रोजी मतदान होणार होते. त्यापैकी शिर्डीतील 4 आणि आणि कळवणमधील 2 जागा बिनविरोध झाल्याने तेथे मतदानाची आवश्यकता राहिली नाही. त्याचबरोबर माळशिरस आणि देवळा येथेही प्रत्येकी एक जागा बिनविरोध झाली. त्यामुळे आता 93 नगरपंचायतीतील 336 जागांसाठी उद्या (ता.18 जानेवारी) मतदान होणार आहे.

local body Election
शिव्याच नाही तर मोदींना मारूही शकतो : नाना पटोले झालेत बेफाम

उद्या मतदान होत असलेल्या नगरपंचायतींची जिल्हानिहाय नावे

  • ठाणे- मुरबाड व शहापूर, रायगड- खालापूर, तळा, माणगाव, म्हसळा, पोलादपूर, पाली (नवनिर्मित),

  • रत्नागिरी- मंडणगड, दापोली,

  • सिंधुदुर्ग- कसई-दोडामार्ग, वाभवे-वैभववाडी, कुडाळ, देवगड- जामसंडे,

  • पुणे-देहू (नवनिर्मित),

  • सातारा- लोणंद, कोरेगाव, पाटण, वडूज, खंडाळा, दहीवडी,

  • सांगली- कडेगाव, खानापूर, कवठे-महाकाळ,

  • सोलापूर- माढा, माळशिरस, महाळूंग-श्रीपूर (नवनिर्मित), वैराग (नवनिर्मित), नातेपुते (नवनिर्मित),

  • नाशिक- निफाड, देवळा, कळवण, दिंडोरी धुळे- साक्री,

  • अहमदनगर- अकोले, कर्जत, पारनेर,

  • जळगाव- बोदवड,

  • औरंगाबाद- सोयगाव,

  • जालना- बदनापूर, जाफ्राबाद, मंठा, घनसावंगी, तीर्थपुरी (नवनिर्मित),

  • परभणी- पालम,

  • बीड- केज, शिरूर-कासार, वडवणी, पाटोदा, आष्टी,

  • लातूर- जळकोट, चाकूर, देवणी, शिरूर-अनंतपाळ,

  • उस्मानाबाद- वाशी, लोहारा बु.

  • नांदेड- नायगाव, अर्धापूर, माहूर,

  • हिंगोली- सेनगाव, औंढा-नागनाथ,

  • अमरावती- भातकुली, तिवसा,

  • बुलडाणा- संग्रामपूर, मोताळा,

  • यवतमाळ- महागाव, कळंब, बाभुळगाव, राळेगाव, मारेगाव,

  • वाशीम- मानोरा,

  • नागपूर- हिंगणा, कुही,

  • वर्धा- कारंजा, आष्टी, सेलू, समुद्रपूर,

  • भंडारा- मोहाडी, लाखनी, लाखांदूर,

  • गोंदिया- सडकअर्जुनी, अर्जुनी, देवरी,

  • चंद्रपूर- सावली, पोंभुर्णा,

  • गोंडपिपरी, कोरपना, जिवती, सिंदेवाही-लोनवाही,

  • गडचिरोली- अहेरी, चामोर्शी, सिरोंचा, धानोरा, कुरखेडा. आदी ठिकाणी मतदान होणार आहे.

local body Election
चंद्रकांतदादांचे आव्हान : हिंमत असेल तर राऊतांनी गोव्यातून निवडणूक लढवावी

जिल्हा परिषदा

भंडारा जिल्हा परिषदेच्या 13 आणि गोंदिया जिल्हा परिषदेच्या 10 व या दोन्ही जिल्ह्यातील पंचायत समित्यांतील 45 जागांसाठी मतदान होणार आहे.

ग्रामपंचायती

विविध जिल्ह्यांतील 195 ग्रामपंचायतींमधील 209 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी उद्या मतदान होईल.

महानगरपालिका

सांगली- मिरज- कुपवाड महानगरपालिकेच्या एका रिक्तपदाच्या पोटनिवडणुकीसाठी देखील उद्या मतदान होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com