Police sub Inspector Tested Covid 19 Positve In Shirval | Sarkarnama

शिरवळमध्ये पोलिस अधिका-याला कोरोनाची लागण

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 2 जून 2020

रविवारी शिरवळ चेकपोस्टवरील सर्व पोलिसांचे स्वॅप घेण्यात आले. सोमवारी रात्री उशीरा त्यांचे रिपोर्ट आले. त्यातील केवळ एका फौजदाराचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. उर्वरितांचा रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

सातारा : सातारा  जिल्हा पोलिस दलांतर्गत येणाऱ्या शिरवळ पोलिस ठाण्यात कर्तव्य बजावत असलेल्या फौजदाराला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  या घटनेमुळे शिरवळ पोलिस ठाण्यात व पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

संबंधित पोलीस अधिकारी सातारा-पुणे जिल्ह्याच्या बॉर्डरवरील चेकपोस्टवर बहुतांशी वेळ कर्तव्य बजावत होते. त्यातूनच त्यांना लागण झाली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा ः शिक्षणमंत्री म्हणतात, राज्यात सर्व शाळांत मराठी विषय शिकवा; अन्यथा...

याबाबत प्राथमिक माहिती अशी, संबंधित फौजदार मुळचे पुणे जिल्ह्यातील आहेत. त्यांची शिरवळ पोलिस ठाण्यात पहिलीच पोस्टिंग आहे. सध्या ते पत्नीसोबत शिरवळमध्ये वास्तव्य करत आहेत. शिरवळ चेक पोस्टवर त्यांची नेहमी ड्यूटी असते. कोरोनामुळे चेक पोस्टवर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची तपासणी होत आहे. यामुळे ट्रॅव्हल हिस्ट्री असणाऱ्या सोबत पोलिसांचा संबंध येतो.

आवश्य वाचा : विठुरायाच्या दर्शनासाठी 30 जूनपर्यंतची प्रतिक्षा

रविवारी शिरवळ चेकपोस्टवरील सर्व पोलिसांचे स्वॅप घेण्यात आले. सोमवारी रात्री उशीरा त्यांचे रिपोर्ट आले. त्यातील केवळ एका फौजदाराचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. उर्वरितांचा रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. फौजदाराला रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. फौजदाराला उपचारासाठी रुग्णालयात पाठवून शिरवळ पोलिस ठाण्यातील काही पोलिसांना क्वॉरंटाईन करण्यात येणार आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख