पालघर :  नगराध्यक्ष कोणाचा यावर अडले दोन्ही काँग्रेसच्या  आघाडीचे घोडे 

लोकसभा पोटनिवडणुकीच्या वेळी तसेच मीरा भाईंदर पालिका निवडणुकीत ज्या प्रमाणे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाण्याची चढाओढ लागली होती तीच परिस्थिती यावेळी पालघर मध्ये दिसणार असल्याने प्रत्येक पक्ष आपल्या संभाव्य उमेदवारांना जपण्याचे काम करताना दिसत आहे.
पालघर :  नगराध्यक्ष कोणाचा यावर अडले दोन्ही काँग्रेसच्या  आघाडीचे घोडे 

विरार   : पालघर नगरपालिकेची निवडणूक मार्च मध्ये होत असून त्या दृष्टीने सार्वच पक्षांनी आपापली मोर्चे बांधणी सुरु केली आहे. युतीची बोलणी पालघर लोकसभा मतदार संघ कोणाकडे यावरून रखडली आहेत असे समजते .  आता आघाडीचे घोडेही  नगराध्यक्ष पद कोणाला यावरून अडल्याचे दिसते . त्यामुळे  येणाऱ्या निवडणुकीत दोन्ही काँग्रेसची आघाडी होणार का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

जर काँग्रेस बरोबर न आल्यास राष्ट्रवादी काँग्रेस व बविआ एकत्रित रित्या निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे समजते. पालघर नगरपालिका निवडणुकीला अवघे २८ दिवस राहिले असून निवडणुकीच्या मोर्चे बांधणीला वेग आला आहे . यासाठी युती आणि दोन्ही काँग्रेसच्या आघाडीची बोलणी सुरु झाली असली तरी आजून त्यावर अंतिम निर्णय मात्र झाला नाही . एका बाजूला देश पातळीवर सेना भाजपमध्ये युती झाली असली तरी पालघरच्या लोकसभा मतदारसंघावरून  युती मधील कार्यकर्ते नाराज असल्याचे दिसत आहे . 

त्यामुळे युतीची बोलणी रखडली आहेत त्यातच आतापर्यंत पालघर नगर पालिकेत सत्त्तेवर असलेली सेना भाजपाला फक्त 3 ते 4 जागा द्यायला तयार आहे . तर भाजपला एवढ्या कमी जागा मान्य नाहीत .  एका बाजूला युतीची ही स्थिती   तर दुसऱ्या बाजूला दोन्ही काँग्रेस मध्ये नगराध्यक्ष पद कोणाला यावरून जुंपली  असल्याने त्यांचीही आघाडीची बोलणी पुढे सरकत नसल्याचे बोलले जात आहे. पालिकेत मागच्यावेळी फक्त एकच नगरसेवक असलेल्या काँग्रेसने नगराध्यक्ष पद मागितल्याने आणि त्याला राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केल्याने आघाडीची बोलणी मात्र पुढे सरकताना दिसत नाही . मात्र बहुजन विकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मात्र आघाडी झाल्यात जमा असल्याचे खात्री लायक समजते एकूणच पालघरची  निवडणूक गाजणार असल्याचे संकेत मिळत आहेत 

          लोकसभा पोटनिवडणुकीच्या वेळी तसेच मीरा भाईंदर पालिका निवडणुकीत  ज्या प्रमाणे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाण्याची चढाओढ लागली होती तीच परिस्थिती यावेळी पालघर मध्ये दिसणार असल्याने प्रत्येक पक्ष आपल्या संभाव्य उमेदवारांना जपण्याचे काम करताना दिसत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com