संजीवराजेंना विधान परिषदेवर घेण्यासाठी फलटणकर आग्रही

फलटण तालुक्यासह जिल्ह्यात संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवला आहे. त्याची दखल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी घेऊन संजीवराजे यांना विधान परिषदेवर काम करण्याची संधी द्यावी.
Sanjivraje Naik Nimbalkar
Sanjivraje Naik Nimbalkar

फलटण शहर : महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष व सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या कार्यकतृत्वाची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी फलटणकरांच्यावतीने येथील पंचायत समितीचे माजी सभापती दत्तात्रय गुंजवटे यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून फलटण तालुक्यातील ग्रामपंचायत ते विधानसभेपर्यंत एक हाती सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे ठेवण्याचे काम महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.

त्यासाठी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे व फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असल्याने संजीवराजे यांना या मतदारसंघांतून निवडून जाता आलेले नाही.

फलटण तालुक्यासह जिल्ह्यात संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवला आहे. त्याची दखल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी घेऊन संजीवराजे यांना विधान परिषदेवर काम करण्याची संधी द्यावी, अशी आग्रही मागणी दत्तात्रय गुंजवटे यांनी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे केली आहे.

संजीवराजे यांचे कर्तृत्व व नेतृत्व जिल्ह्याला माहित असून अशा कर्तृत्ववान नेतृत्वाला विधान परिषदेवर घेऊन संधी दिली तर सातारा जिल्ह्यात पक्षाची अजून चांगली बांधणी होईल. संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे संपूर्ण सातारा जिल्ह्यामधील प्रत्येक तालुक्यामध्ये विविध घटकांची अतिशय चांगले संबंध असून या संबंधांचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला होईल. त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना विधान परिषदेवर संधी द्यावी, अशी मागणी श्री. गुंजवटे यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com