शेतकऱ्यांनाे बांबू लावा, पाशा पटेल यांचे आवाहन..

शेतकऱ्यांना आता याच पिकाची लागवड करावी लागणार आहे. यांचे रोप मी शेतकऱ्यांना देईल. सरकारने बांबू शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी तीन योजना जाहिर केल्या आहेत. यात शेतकऱ्यांनी ३५ रूपयांचे बांबूचे झाड लावल्यावर ५८० रुपये मिळतात. यासह नॅशनल बांबू मिशन मध्ये बांबू लागवडसाठी १२० रुपये आणि अट्टल बांबू मिशन मध्ये २७ रुपये सबसीडी मिळते. तेव्हा शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन पाशा पटेल यांनी केले.
Ex Mla Pasha Patel Apeal  Farmars news
Ex Mla Pasha Patel Apeal Farmars news

औरंगाबाद : बांबू हे शेतकऱ्यांचे बुह उपयोगी पिक आहे. ते पर्यावरणास पुरक असून कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. शेतकऱ्यांना या माध्यमातून जोड धंदा मिळवा म्हणून शासनस्तरावर प्रयत्न केले जात आहे. बांबूपासून अनेक वस्तू बनवल्या जातात. याच अंतर्गत बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी मराठवाड्यात मांजूर,गोदावरी नदीच्या काठावर तसेच शेतकऱ्यांच्या बांधावर एक कोटी बांबूची लागवड करणार असल्याची माहिती माजी आमदार तथा राज्य कृषी मुल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली.

औरंगाबादेत पत्रकार परिषदेत त्यांनी बांबू लागवडीचे फायदे या विषयावर सविस्तर माहिती दिली. पाशा पटेल म्हणाले, मराठवाडा नदी खोरे पुनर्वसन चळवळ हाती घेण्यात आली आहे. याच अंतर्गत एक कोटी बांबूची लागवड करण्यात येणार आहे. यासाठी केंद्रीय कृषीमंत्र्यांशी पत्रव्यवहारही झाला असून त्यांच्याकडून यासाठी मंजूरी मिळाली आहेत. दुष्काळी मराठवाडा ही ओळख पुसुन टाकण्यासाठी आता नदी काठी बांबूची झाडे असणे गरजेचे आहे.

मांजरा. गोदावरी यासह छोट्या नदी, खोऱ्याच्या किनाऱ्यावर तसेच शेतकऱ्यांच्या बांधावर ही झाडे लावण्यात येणार आहे. बांबूच्या झांडामुळे माती पकडून ठेवण्याची क्षमता वाढते. अतिवृष्टी झाल्यावरही बांबू हे माती अडवून धरण्याचे काम करते. बीड जिल्ह्यातील जवळवाडी येथे अकरा बांबु लावून या उपक्रमास नुकतीच सुरुवात केली आहे. गोदावरी मांजरा नदीच्या काठावर देखील बांबु लावण्यात येणार आहे. मराठवाड्यात वनाचे प्रमाण कमी आहे, अशीच परिस्थिती राहिली तर वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे हा उपक्रम हाती घेतला आहे.

काही ठिकाणी अधिकाऱ्यांकडून केवळ कागदोपत्री झाडे लावण्यात आल्याचा आरोपही पटेल यांनी यावेळी केला. हे पिक कल्पवृक्ष आहे, शेतकऱ्यांना आता याच पिकाची लागवड करावी लागणार आहे. यांचे रोप मी शेतकऱ्यांना देईल. सरकारने बांबू शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी तीन योजना जाहिर केल्या आहेत. यात शेतकऱ्यांनी ३५ रूपयांचे बांबूचे झाड लावल्यावर ५८० रुपये मिळतात. यासह नॅशनल बांबू  मिशन मध्ये बांबू लागवडसाठी १२० रुपये आणि अट्टल बांबू मिशन मध्ये २७ रुपये सबसीडी मिळते. तेव्हा शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन पाशा पटेल यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com